Anant Radhika Engagement : साखरपुडा अनंत अंबानीचा; पण चर्चा मात्र ऐश्वर्या राय बच्चन अन् आराध्याची
Anant Radhika Engagement : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा नुकताच साखरपुडा पार पडला असून या साखरपुड्यात ऐश्वर्या राय-बच्चन आणि आराध्या बच्चनने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.
Anant Radhika Engagement : अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडला. पण या सगळ्यात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि तिची लेक आराध्याने (Aaradhya Bachchan) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
ऐश्वर्या आणि आराध्याने साखरपुड्यात अनारकली ड्रेस परिधान केला होता. त्यांचा पारंपारिक लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला. आराध्याने सौंदर्यवती ऐश्वर्या राय-बच्चनला टक्कर दिली असल्याचं चाहते म्हणाले. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि आराध्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
ऐश्वर्या अनेकदा तिच्या लाडक्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण अनंत अंबानीच्या साखरपुड्यात आराध्याचा एक वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आराध्याच्या फोटोवर 'छोटी परी एवढी मोठी कधी झाली', अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
View this post on Instagram
अनंत अंबानीच्या साखरपुड्यात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्याने डिझायनर सूट परिधान केला होता. माय-लेकीचा नखरेल अंदाज साखरपुड्याच्या कार्यक्रमात चांगलाच भाव खाऊन गेला. अंबानी आणि बच्चन कुटुंबीयांचं मैत्रीचं नातं आहे.
अनंत अंबानीच्या साखरपुड्यात सेलिब्रिटींनी लावली हजेरी!
अनंत अंबानीच्या साखरपुड्यात अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. अनन्या पांडे (Ananya Panday), अर्जुन कपूर (Arjun Kapoor), किरण राव (Kiran Rao), सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), सलमान खान (Salman Khan) आणि त्याची भाची अलिझेहसोबत दिसला. त्याचसोबत ज्येष्ठ अभिनेत्री नीतू सिंह (Neetu Singh) अशा अनेक सेलिब्रिटींचा यात समावेश आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा साखरपुडा (Anant Radhika Engagement)
मुंबईतील अँटिलिया बंगल्यामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा पार पडला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा रोका 29 डिसेंबर 2022 रोजी राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरामध्ये झाला होता. यानंतर अंबानी कुटुंबाने मुंबईत एंगेजमेंट पार्टीही आयोजित केली होती. लवकरच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे लग्नबंधनात अडकणार आहे.
संबंधित बातम्या