Anant-Radhika Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नात अख्खं बॉलिवूड अवतरलं; सलमान, शाहरुख, प्रियंका, आलिया ते अनन्याची फुल ऑन मस्ती
Bollywood Celebrities in Anant-Radhika Wedding :

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट आज लग्नबंधनात अडकणार आहेत. बीकेसीमधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा लग्नसोहळा पार पडत आहे. अनंत-राधिकाच्या लग्नसोहळा सुरू झाला आहे. कुटुंबातील नवीन सदस्याचे स्वागत करण्यासाठी अंबानी निवासस्थान नवरीप्रमाणे सजवण्यात आलं आहे. अँटिलियामधून वाजत गाजत वरात घेऊन अनंत बीकेसीमध्ये पोहोचला. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वरात पोहोचताच कलाकारांनी ढोल-ताशाच्या तालावर नाचायला सुरुवात केली.
अनंत-राधिकाच्या लग्नात अख्खं बॉलिवूड अवतरलं
अनंत आणि राधिकाचा विवाह पारंपारिक वैदिक हिंदू रितीरिवाजांनुसार होणार आहे. अनंत आणि राधिका दोघेही गुजराती कुटुंबातील आहेत, त्यामुळे त्यांच्या लग्न गुजराती विधी होतील. एकीकडे लग्नातील विधी सुरु असून दुसरीकडे पाहुण्यांचं आगमन सुरू आहे. अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नाला देशातील दिग्गज नेते, कलाकार, खेळाडू यासह अनेक परदेशी पाहुणे येणार आहेत. लग्नासाठी अनेक प्रसिद्ध लोक पोहोचले आहेत. पापाराझींनी सर्व सेलिब्रिटी पोझ देताना दिसत आहेत. तर सेलिब्रिटी मंडळी लग्नात डान्स करत फुल ऑन मजा घेताना दिसत आहेत.
सलमान, शाहरुख, प्रियंका, आलिया ते अनन्याची फुल ऑन मस्ती
View this post on Instagram
रणवीर सिंह ब्लॉकबस्टर एनर्जीमध्ये डीजे चिताससोबत स्टेज शेअर करताना दिसला.
View this post on Instagram
वऱ्हाडी मंडळी पंजाबी गायिका भूपिंदर बब्बलच्या तालावर नाचताना पाहायला मिळाले.
View this post on Instagram
एव्हर यंग अभिनेते अनिल कपूर वन टू का फोर गाण्यावर डान्स करताना दिसले.
View this post on Instagram
रणवीर सिंह, अनिल कपूर, वरुण धवन आणि क्रिती सेनन एकत्र डान्स करताना दिसले.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :
VIDEO : लेकाच्या वरातीत आई नीता अंबानीचे ठुमके, वयाच्या 60 व्या वर्षी तरुणाईला लाजवेलं असं सौंदर्य
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
