Anand Mahindra: "ये दिल मांगे मोर" म्हणत आनंद महिंद्रा यांनी "12वी फेल" चित्रपटाचं केलं कौतुक; विक्रांतबद्दल म्हणाले...
Anand Mahindra Reviews 12th Fail: अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन 12वी फेल या चित्रपटातीचं कौतुक केलं आहे. आता आनंद महिंद्रा यांनी देखील या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
Anand Mahindra Reviews 12th Fail: सध्या अभिनेता विक्रांत मेस्सीच्या (Vikrant Massey) 12वी फेल (12th Fail) या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत. हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन 12वी फेल या चित्रपटातीचं कौतुक केलं आहे. आता आनंद महिंद्रा यांनी देखील या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. आनंद महिंद्रा यांनी 12वी फेल या चित्रपटाचा रिव्ह्यू ट्विटरवर शेअर केला आहे.
आनंद महिंद्रा यांचे ट्वीट
आनंद महिंद्रा यांनी ट्वीट शेअर करुन चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचेही त्यांनी कौतुक केले. आनंद महिंद्रा यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, "या गेल्या वीकेंडला '12वी फेल' चित्रपट पाहिला.जर तुम्ही या वर्षी एकच चित्रपट बघायचं ठरलं तर तुम्ही हा चित्रपट बघा.
1) कथानक : ही कथा देशातील रिअल हिरोवर आधारित आहे. केवळ नायकच नाही, तर लाखो तरुण, यशासाठी भुकेले आहेत, जे जगातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विलक्षण अडचणींविरुद्ध संघर्ष करतात.
२) अभिनय:विधु चोप्रा यांचे कास्टिंग उत्कृष्ट आहे. प्रत्येक भूमिका उत्कृष्ट पद्धतीनं पार पाडण्यात आली आहे.पण विक्रांत मेस्सीनं राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी पात्र असा ब्रेव्हरा परफॉर्मन्स दिला आहे. तो केवळ भूमिका साकारत नसून तो ती भूमिका जगत होता.
३) नरेटिव्ह स्टाईल: विधू चोप्रा आपल्याला आठवण करून देतात की, चांगला सिनेमा हा उत्तम कथेवर आधारित असतो.
माझ्यासाठी मुख्य आकर्षण म्हणजे मुलाखतीचा सीन. होय, हे थोडेसे काल्पनिक वाटू शकते, परंतु सीनमधील सखोल संवादामुळे हा क्रम तुमच्या डोळ्यांसमोर येतो आणि भारताने नवीन भारत निर्माण करण्यासाठी काय केले पाहिजे हे दाखवतो. मिस्टर चोप्रा, 'ये दिल मांगे मोर' यासारखे आणखी चित्रपट बनवा!'
Finally saw ‘12th FAIL’ over this past weekend.
— anand mahindra (@anandmahindra) January 17, 2024
If you see only ONE film this year, make it this one.
Why?
1) Plot: This story is based on real-life heroes of the country. Not just the protagonist, but the millions of youth, hungry for success, who struggle against extrordinary… pic.twitter.com/vk5DVx7sOx
आनंद महिंद्रा यांच्या या ट्वीटला विक्रांतनं रिप्लाय दिला आहे. त्यानं रिप्लायमध्ये लिहिलं, "धन्यवाद मिस्टर महिंद्र, आमच्या आमच्या प्रयत्नांचे तुम्ही कौतुक केलं, हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.आणि मला खात्री आहे की, हे वाचल्यानंतर आमच्या टीमचा प्रत्येक सदस्य उत्साही झाला असेल.तुम्ही लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहात. कदाचित आम्ही चांगले काम केलं आहे, तुमचे पुन्हा एकदा आभार!"
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Alia Bhatt : '12 वी फेल' चं आलियानं केलं तोंडभरुन कौतुक; हृतिकनं केलेली 'ही' चूक टाळली