एक्स्प्लोर
अमृता फडणवीस-बिग बी यांचा म्युझिक व्हिडीओ लवकरच भेटीला

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वातला आणखी एक नवा पैलू समोर आला आहे. अमृता फडणवीस आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रीत झालेला एक म्युझिक व्हिडीओ लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. दक्षिण मुंबईतील ऑपेरा हाऊसमध्ये या व्हिडीओचं शूटिंग करण्यात आलं. विशेष म्हणजे यावेळी अमृता फडणवीसांचा निराळा अंदाज पाहायला मिळाला. रेड ड्रेस आणि हाय हील्समध्ये अमृता फडणवीस ग्लॅमरस दिसत आहेत. याआधीही अमृता फडणवीस गाण्याच्या माध्यमातून अनेकदा कॅमेऱ्यासमोर झळकल्या आहेत. आताही त्या आपल्या सूरांसोबत अभिनयाची जादूही चाहत्यांना दाखवणार आहेत. मुंबई मिररनेही अमिताभ आणि अमृता यांचा फोटो छापला आहे. तर खुद्द अमिताभ बच्चन यांनी आपण एका सेलिब्रिटीसोबत शूट करत असल्याचं ट्वीट करुन या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'फिर से' असं या म्युझिक व्हिडीओचं नाव असून अहमद खानने त्याचं दिग्दर्शन केलं आहे. तर भूषण कुमार यांनी या व्हिडीओची निर्मिती केली आहे. "अमिताभ बच्चन प्रमुख असलेल्या परफॉर्मिंग आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये अमृता फडणवीस यांना अॅडमिशन घ्यायचं आहे. या दोघांमध्ये संवादात्मक सीन आहे, असं या व्हिडीओमध्ये दिसणार असल्याचं दिग्दर्शक अहमद खानने सांगितलं. अमृता फडणवीस यांनी यापूर्वी कुणार कपूरच्या 'फिर से' आणि प्रकाश झा यांच्या 'जय गंगाजल'मध्ये पार्श्वगायन केलं आहे. आता लवकरच त्या आपल्या अभिनयाची झलक दाखवणार आहेत. https://twitter.com/SrBachchan/status/803696287338086401
आणखी वाचा























