Amitabh Bachchan Signature Style Origin : भाजलेल्या हातामुळे मिळाली बिग बींना मिळाली आपली सिग्नेचर पोझ; जाणून घ्या किस्सा...
Amitabh Bachchan Signature Style Origin : पँटच्या खिशात एक हात ठेवून संवाद बोलण्याच्या अमिताभ बच्चन यांच्या शैलीची चाहत्यांना आजही भुरळ आहे. मात्र, ही सिग्नेचर स्टाईल एका अपघाताने मिळाली.
Amitabh Bachchan Signature Style Origin : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा अभिनय, त्याचा आवाज आणि संवाद फेकीची खास शैली यामुळे मागील अनेक दशकांपासून ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. कधी काळी पँटच्या एका खिशात हात टाकून बोलण्याच्या त्यांच्या स्टाइलने लोकांना भुरळ पाडली होती. अमिताभ यांची हीच स्टाईल त्यांची ओळख बनली, सिग्नेचर स्टाईल झाली. मात्र, त्यांची ही स्टाईल एका अडचणीमुळे झाली होती.
एकदा दिवाळीच्या दिवसात अमिताभ बच्चन यांच्यासोबत अपघात झाला होता. फटाक्यांमुळे त्याचा उजवा हात भाजला गेला होता. त्यांच्या हातावर भाजलेल्या खुणा खोलवर होत्या ज्या कॅमेऱ्यात सहज दिसत होत्या आणि त्याच दरम्यान अमिताभ बच्चन यांना 'शराबी' चित्रपटाचे शूटिंग करायचे होते. बिग बींना चित्रपटाचे शूटिंग कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचे होते.
कशी मिळाली 'बिग बीं'ना सिग्नेचर स्टाईल?
'शराबी'चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी अमिताभ बच्चन यांना त्यांचा जळालेला हात पँटच्या खिशात ठेवण्याचा सल्ला दिला होता. तसेच अमिताभ यांनी खिशात हात ठेवून संपूर्ण चित्रपट शूट केला. खरंतर भाजलेला हात लपवण्यासाठी त्यांनी केलेली ही तडजोड होती. मात्र, लोकांना त्यांची ही स्टाईल आवडली. त्यानंतर पुढे बिग बींची ही पोझ सिग्नेचर स्टाइल बनली.
View this post on Instagram
भाजलेल्या हातातून व्हायचा रक्तस्त्राव...
'शराबी' चित्रपटातील गाण्याच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांनी हातावर घुंगरू बांधले होते. मात्र यामुळे त्याचा जळालेला हात अधिकच जखमी झाला आणि हातातून रक्त येऊ लागले. पण दिग्दर्शकानेही त्या दृष्याचा चित्रपटात वापर केला आहे.