Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांना कंगाल झाल्यानंतर धीरुभाई अंबानींनी दिला होता मदतीचा हात; पण मदत नको म्हणत...
Amitabh Bachchan Video Viral : अमिताभ बच्चन यांना पैशांची गरज होती त्यावेळी धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांनी त्यांना आर्थिक मदतीसाठी विचारणा केली होती.
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) कधी त्यांच्या कलाकृतींमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. बिग बी यांना पैशांची गरज होती त्यावेळी धीरुभाई अंबानींनी (Dhirubhai Ambani) त्यांना मदतीचा दिला होता. यासंदर्भातील एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नव्वदच्या दशकात अमिताभ बच्चन यांचे वाईट दिवस सुरू होते. कोट्यवधींचे मालक असणाऱ्या अमिताभ बच्चन यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यावेळी अमिताभ बच्चन यांना देशातील श्रीमंत उद्योगपती धीरुभाई अंबानी यांनी मदतीचा हात दिला होता.
अमिताभ बच्चन यांचा जुना व्हिडीओ व्हायरल
अमिताभ बच्चन यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बिग बी बोलत आहेत,"आयुष्यात एकेकाळी मी कर्जबाजारी झालो होतो. कोट्यवधी रुपयांचं कर्ज माझ्या डोक्यावर होतं. माझा बँक बँलेस शून्य झाला होता. कमाईचे सर्व मार्ग बंद झाले होते. काही दिवसांनी धीरुभाई अंबानी यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं की,"अमिताभचे वाईट दिवस सुरू आहेत. त्याला आर्थिक मदत कर".
Amitabh Bachchan shared his bankruptcy story, which moved Mukesh Ambani pic.twitter.com/x8Wls2ZoDs
— Abhijit Chokshi | Investors का दोस्त (@stockifi_Invest) January 24, 2024
धीरुभाई अंबानींची मदत बिग बींनी स्वीकारली का?
धीरुभाई अंबानींच्या मदतीबद्दल बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले,"धीरुभाई अंबानींनी केलेली मदत मी स्वीकारली असती तर माझ्या सर्व अडचणी दूर झाल्या असत्या. मी कर्जमुक्त झालो असतो. पण मी त्यांची मदत न घेण्याचं ठरवलं. देवाच्या कृपेने माझे सुगीचे दिवस सुरू झाले. पुढे मी कर्जमुक्तही झालो".
पैशांपेक्षा मोलाचे धीरुभाईंचे शब्द : अमिताभ बच्चन
धीरूभाईंनी त्यांच्या घरी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते. दरम्यान धीरुभाईंची नजर माझ्यावर पडली आणि त्यांनी मला बोलावलं. मला म्हणाले,"माझ्याजवळ येऊन बस". त्यावेळी मी त्यांची क्षमा मागत म्हणालो,"माझ्या मित्रांसोबतच बसतो. मी तिथेच ठिक आहे". त्यावेळी त्या कार्यक्रमात धीरूभाई म्हणाले,"हा मुलगा पूर्णपणे खचला होता. पण नंतर स्वत:च्या पायावर उभा राहिला. त्यामुळे मी कायमच या मुलाचा आदर करतो". धीरूभाई अंबानी यांच्या पैशांपेक्षा त्यांचे शब्द माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत.
संबंधित बातम्या