एक्स्प्लोर

बिग बींनी वापरलेली मर्सिडीज बेंझ कार OLX वर विक्रीला

अमिताभ बच्चन यांनी कोणे एके काळी वापरलेल्या मर्सिडीज बेंझ कार ओएलएक्सवर केवळ 9.99 लाख रुपयांना विक्रीला काढण्यात आली आहे

मुंबई : बॉलिवूडमधील बऱ्याचशा कलाकारांना महागड्या कार वापरण्याचा शौक असतो. महानायक अमिताभ बच्चन यांची गाड्यांविषयीची हौस जगजाहीर आहे. बिग बींनी कोणे एके काळी वापरलेली मर्सिडीज बेंझ एस क्लास लक्झरी कार विक्रीस निघाली आहे. ओएलएक्स या शॉपिंग साईटवर या गाडीची जाहिरात पाहायला मिळत आहे. बिग बींनी रेंज रोवर, लेक्सस एलएक्स 570, बेंटली काँटिनेंटल जीटी यासारख्या लक्झुरिअल कार्स वापरल्या आहेत. त्यांच्या ताफ्यात कोणे एके काळी असलेली मर्सिडीज विकत घेण्याची संधी तुम्हाला आहे. ओएलएक्सवर या गाडीची किंमत केवळ 9.99 लाख रुपये लावण्यात आली आहे. संबंधित मालक हा या गाडीचा तिसरा वापरकर्ता असल्याची माहिती आहे. अमिताभ बच्चन यांनी बिहारमधील 2100 शेतकऱ्यांचं कर्ज फेडलं ती अमिताभ बच्चन यांनी वापरलेली कार असल्याचा दावा करण्यात आला आहे. गाडीचा रंग आणि नोंदणी क्रमांक तोच असल्यामुळे शंकेला वाव कमी आहे. तरीही या पोस्टमधील तथ्य आणि सत्यता पडताळता आलेली नाही. या गाडीने आतापर्यंत 55 हजार किलोमीटर रनिंग केल्याचा उल्लेख पोस्टमध्ये आहे. अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी आपल्या लाडक्या सुपरस्टारची गाडी विकत घेणं ही पर्वणी असू शकते. त्यामुळे या जाहिरातीनंतर किती जणांच्या उड्या पडल्या आणि त्यापैकी कोण या गाडीचा मालक होणार, याबाबत कुतूहल आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhurandhar: आता घरबसल्या 'Dhurandhar' बघा, वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर डेट कन्फर्म, कधी अन् कोणत्या चॅनेलवर पाहता येणार?
आता घरबसल्या 'Dhurandhar' बघा, वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर डेट कन्फर्म, कधी अन् कोणत्या चॅनेलवर पाहता येणार?
Special Ops 8 Episode Spy Thriller Series: सस्पेंसचा पॉवर हाऊस 'ही' 8 एपिसोडची स्पाय थ्रिलर; 6 वर्षांपासून क्रेझ कायम, डोक्याचा भुगा करते 8.6 रेटिंगवाली सीरीज
सस्पेंसचा पॉवर हाऊस 'ही' 8 एपिसोडची स्पाय थ्रिलर; 6 वर्षांपासून क्रेझ कायम, डोक्याचा भुगा करते 8.6 रेटिंगवाली सीरीज
Sonu Nigam: 'Pakistanमध्ये माझ्यावर हल्ला झालेला, पण त्यांनीच मला वाचवलेलं...', कराची बॉम्बब्लास्टमधून सुखरुप बचावलेला सोनू निगम, नेमकं काय घडलेलं?
'Pakistanमध्ये माझ्यावर हल्ला झालेला, पण त्यांनीच मला वाचवलेलं...', कराची बॉम्बब्लास्टमधून सुखरुप बचावलेला सोनू निगम, नेमकं काय घडलेलं?
Dhurandhar 2 Box Office Collection Day 12: बॉक्स ऑफिस 'धुरंधर 2'च्या ताब्यात; KGF 2 च्या रेकॉर्ड्सचा अक्षरशः चक्काचूर, भल्याभल्या दिग्गजांना लोळवलं
बॉक्स ऑफिस 'धुरंधर 2'च्या ताब्यात; KGF 2 च्या रेकॉर्ड्सचा अक्षरशः चक्काचूर, भल्याभल्या दिग्गजांना लोळवलं

व्हिडीओ

Eknath Khadse Jalgaon : महार वतनाच्या जमीन हडपल्याचा आरोप, एकनाथ खडसे काय म्हणाले?
Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report
Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report
Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime news: वडिलांसोबतच्या भांडणाचा राग चिमुरड्यावर काढला, रिक्षातून बाहेर काढून जोरात जमिनीवर आपटलं, रक्ताची उलटी, वसईत हादरवणारी घटना
वडिलांसोबतच्या भांडणाचा राग चिमुरड्यावर काढला, रिक्षातून बाहेर काढून जोरात जमिनीवर आपटलं, रक्ताची उलटी, वसईत हादरवणारी घटना
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
Rupali Chakankar and Ashok Kharat: नाशिकला पदराने अशोक खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; अंजली दमानियांची रुपाली चाकणकरांवर टीका
तेव्हा नाशिकला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; दमानियांची चाकणकरांवर टीका
Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
South Cinema Actress Net Worth: ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
Fairness Cream Alert : गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
Embed widget