Modi vs Amitabh Bachchan : जस्ट लुकिंग लाइक अ वॉव; 81 वर्षीय अमिताभ बच्चन यांचा स्विमिंग स्पेशल लूक पाहिलात का?
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचा 'स्विमिंग ड्रेस'मधील फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या चर्चेत आहेत. पण सध्या ते कोणत्याही सिनेमामुळे चर्चेत आलेले नसून त्यांच्या एका लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'स्विमिंग ड्रेस'मधील फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
अमिताभ बच्चन सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत. लहान मुलांसोबत ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच बिग बी प्रेरणा देत असतात. त्यांच्या यशस्वी करिअरसह सोशल मीडियावरील पोस्टनेदेखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता त्यांनी स्विमिंगबद्दल आलेल्या अनुभवाबद्दल एक मदेशीर पोस्ट शेअर केली आहे.
अमिताभ बच्चन यांच्या लूकने वेधलं लक्ष (Amitabh Bachchan Look)
अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर समुद्र किनाऱ्यावरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर त्यांनी बनियन, मॅचिंग शॉर्ट्स आणि त्यावर स्विमिंग जॅकेट आणि काळा चष्मा घातलेला दिसत आहे. या फोटोपेक्षा त्यांचं कॅप्शन खूपच लक्षवेधी आहे. त्यांनी लिहिलं आहे,
"एबी : एक्सक्यूज मी सर.."
गाइड : हा
एबी : अमेरिका किती दूर आहे?
गाइड : शांत बसा आणि स्विमिंग करा
View this post on Instagram
अमिताभ बच्चन यांचं चाहत्यांकडून कौतुक
अमिताभ बच्चन यांचा फोटो आणि कॅप्शन चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. चाहते कौतुक करत आहे. या वयातला तुमचा फिटनेस मानला, सर तुम्ही अद्भुत आहात, जस्ट लुकिंग लाइक अ वाव, कमाल, मोदीजी वर्सेस अमिताभ बच्चन, महानायक, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
अमिताभ बच्चन यांच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या.. (Amitabh Bachchan Upcoming Movies)
अमिताभ बच्चन यांनी नुकतचं 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाला अलविदा केलं आहे. टायगर श्रॉफ आणि कृती सेनन अभिनीत 'गणपथ' या सिनेमात ते दिसून आले होते. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. प्रभास, कमल हासन, दीपिका पादुकोण आणि दिशा पटानी यांच्या 'कल्कि 2898 एडी' या सिनेमात आता बिग बी दिसणार आहेत. 2024 मध्ये हा सिनेमा रिलीज होईल.
संबंधित बातम्या