Amitabh Bachchan : अमिताभ यांच्याबद्दल जया बच्चन काय बोलून गेल्या,"म्हणाल्या,"माझ्याऐवजी दुसरी कोणी असती तर..."
Amitabh Bachchan Jaya Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन अनेकदा आपली पत्नी जया बच्चनचं कौतुक करताना दिसून येतात. जया बच्चनवर प्रेम असल्याचं ते नेहमीच कॅमेऱ्यासमोर सांगत असतात. पण जया बच्चन मात्र बिग बींबद्दल जास्त बोलताना दिसून येत नाही.
Amitabh Bachchan Jaya Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी सिनेमांमुळे (Movies) तर कधी वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे ते चर्चेत असतात. अमिताभ बच्चन अनेकदा आपली पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) यांचं कौतुक करताना दिसून येतात. आपली लेडी लव्ह जया बच्चनवर आपलं खूप प्रेम असल्याचं ते कॅमेऱ्यासमोर सांगताना दिसून येतात. जया बच्चन यांच्यावर प्रेम करण्यासोबत ते त्यांना घाबरतातदेखील. दुसरीकडे जया बच्चन या अमिताभ बच्चन यांच्याबद्दल जास्त बोलताना दिसून येत नाहीत. आता नुकत्याच एका मुलाखतीत जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल भाष्य केलं आहे.
जया बच्चन यांच्या वक्तव्याने वेधलं लक्ष
अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन यादेखील उत्कृष्ट अभिनेत्री आहेत. अभिनेत्री असण्यासोबत त्या राजकाणातदेखील सक्रीय आहेत. नुकतचं सिमी ग्रेवालला दिलेल्या मुलाखतीत जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल खुलेपणाने भाष्य केलं आहे. तसेच लग्न आणि रोमान्स याबद्दलदेखील त्यांनी अनेक खुलासे केले आहेत.
सिमी ग्रेवालच्या मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांना पत्नी म्हणून 10 पैकी 7 रेटिंग दिले होते. तर जया बच्चन यांनी बिग बींना 10 पेकी 5 रेटिंग दिले आहे. अमिताभ बच्चन यांच्यात अनेक गोष्टींमध्ये कमतरता असल्याचं जया बच्चन यांनी सांगितलं आहे. अनेक गोष्टींचा ते अवलंब करत नाहीत.
"बिग बी कधीही वेळेवर जेवण करत नाहीत" : जया बच्चन
जया बच्चन म्हणाल्या,"बिग बी कधीही वेळेवर जेवण करत नाहीत. नेहमीच ते जेवण उशीरा करतात. जेवण गरम असताना छान लागतं. पण बिग बी ते थंड झाल्यावर येतात. ही अत्यंत वाईट सवय आहे. अभिषेकसोबत जेवण करायला ते कधीच येत नाहीत. पण श्वेता जर घरी आली असेल तर तिच्यासोबत जेवण करायला ते येतात. बिग बींच्या प्रॉयोरिटी लिस्टमध्ये माझं नाव सगळ्यात शेवटी आहे. बिग बींच्या प्रॉयोरिटी लिस्टमध्ये सगळ्यात आधी पालक, मग मुलं, त्यानंतर काम आणि मग मी आहे".
माझे पती अजिबात रोमँटिक नाही : बिग बी
जया बच्चन पुढे म्हणाल्या,"अमिताभ बच्चन माझ्यासोबत अजिबात रोमँटिक नाहीत. ते प्रचंड लाजाळू आहेत. प्रेमाची कबुली द्यायला त्यांना आवडत नाही. मी त्यांची गर्लफ्रेंड असतानाही ते माझ्यासोबत कमी बोलत असे. माझ्याऐवजी जर दुसरी गर्लफ्रेंड असती तर कदाचित चित्र वेगळं असतं".
संबंधित बातम्या