Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी अयोध्येनंतर 'या' ठिकाणी विकत घेतली प्रॉपर्टी; किंमत ऐकूण बसेल धक्का
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी अयोध्येनंतर आता अलिबागमध्ये नवी प्रॉपर्टी विकत घेतली आहे. बिग बी यांच्या नव्या प्रॉपर्टीची किंमत ऐकूण चाहत्यांनी धक्का बसेल.
Amitabh Bachchan New Property : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या 'कल्कि 2898 एडी' (Kalki 2898 AD) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटातील बिग बींचा लूक समोर आला आहे. बिग बींचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून ते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटात ते अश्वथामाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील बिग बींचा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत. व्यावसायिक चित्रपटांसह अमिताभ बच्चन सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. अयोध्येनंतर अमिताभ बच्चन यांनी आता अलिबागमध्ये प्रॉपर्टी विकत घेतली आहे.
अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी अयोध्येत प्रॉपर्टी विकत घेतली होती. आता त्यांनी महाराष्ट्रातील मुंबईजवळ असणाऱ्या अलिबागमध्ये 'द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा'मध्ये (HOABL) 10 कोटी रुपये खर्च करत 10,000 स्क्वेअर फूट जमीन खरेदी केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, बिग बींच्या नव्या प्रॉपर्टीचं रजिस्ट्रेशन मागच्या आठवड्यात झालं आहे. अमिताभ बच्चन यांची नवी प्रॉपर्टी 20 एकरमध्ये पसरलेली आहे. एप्रिल 2023 मध्ये ही प्रॉपर्टी लॉन्च करण्यात आली होती. नव्या प्रॉपर्टीबद्दल अमिताभ बच्चन यांनी अद्याप चाहत्यांना काहीही माहिती दिलेली नाही. अमिताभ बच्चन यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी अलिबागमध्ये प्रॉपर्टी विकत घेतली आहे.
बिग बींनी अयोध्येत घेतली जमीन
अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत घरासाठी प्लॉट खरेदी केला आहे. 10,000 स्केअर फुटाच्या या फ्लॉटची किंमत 14.5 कोटी रुपयांच्या आसपास आहे. बिग बींनी 'द हाऊस ऑफ अभिनंद लोढा' या बॅनरअंतर्गत अयोध्येत प्लॉट विकत घेतला आहे. अयोध्येत राहण्यासाठी बिग बी खूपच उत्सुक आहेत.
अमिताभ बच्चन यांची एकूण प्रॉपर्टी (Amitabh Bachchan Property)
अमिताभ बच्चन आपल्या कुटुंबियांसह जुहू येथील 'जलसा' बंगल्यात राहतात. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी 2023 मध्ये आपली लाडकी लेक श्वेता नंदाला त्यांचा दुसरा बंगला प्रतीक्षा भेट म्हणून दिला होता. जुहू परिसरात अमिताभ बच्चन यांचे जनक, वत्स आणि अम्मू हे बंगले आहेत. 2021 मध्ये अमिताभ बच्चन यांनी नवी दिल्लीतील गुलमोहर पार्कमध्ये सोपान हा बंगला 23 कोटी रुपयांत खरेदी केला होता. अमिताभ बच्चन एकूण संपत्तीच्या बाबतीतदेखील आघाडीवर आहेत. चित्रपट, जाहिराती आणि टिव्ही शोच्या माध्यमातून ते चांगलीच कमाई करतात. आता त्यांच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या