एक्स्प्लोर

Amitabh Bachchan: चित्रपटांच्या पोस्टर्सपासून ते खास फोटोंपर्यंत, बिग बींच्या 'या' खास गोष्टींचा होणार लिलाव! चाहत्यांना खरेदीची संधी...

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या 81 व्या वाढदिवसापूर्वी त्यांच्या काही खास वस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे.

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा 11 ऑक्टोबर रोजी  81 वा वाढदिवस आहे. बिग बींचा वाढदिवस हा त्यांच्या चाहत्यांसाठी खास असणार आहे. कारण अमिताभ बच्चन यांच्या 81 व्या वाढदिवसापूर्वी त्यांच्या काही खास वस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे.

बिग बींच्या वाढदिवसापूर्वी 5 ऑक्टोबरपासून 7 ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या काही खास वस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. हा लिलाव Rivas & Ives द्वारे आयोजित केला जात आहे. Rivas & Ives हे एक ऑक्शन हाऊस आहे. 

कोणत्या वस्तूंचा होणार लिलाव?

'बच्चनेलिया' नावाचा या ऑक्शन  कार्यक्रमाद्वारे अमिताभ बच्चन यांच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमात चाहत्यांना अमिताभ बच्चन यांच्या सिनेमॅटिक करिअरला पुन्हा पाहण्याची संधी मिळणार आहे. या ऑक्शनमध्ये अमिताभ बच्चन यांच्या  चित्रपटांचे काही पोस्टर्स, फोटो, लॉबी कार्ड, शोकार्ड, फिल्म बुकलेट आणि ओरिजनल आर्टवर्क या वस्तू लिलावासाठी ठेवण्यात येणार आहेत. 

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसापूर्वी होणार्‍या लिलावात अनेक खास गोष्टी असणार आहे. त्यामध्ये 'जंजीर', 'दीवार', 'फरार'चे शोकार्ड सेट, 'शोले' चित्रपटाची फोटोग्राफ, 'शोले' चित्रपट रिलीज झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या रमेश सिप्पी यांच्या खास पार्टीतील चार फोटो, 'मजबूर' चित्रपटाचे दुर्मिळ पोस्टर्स यांचा समावेश असणार आहे.  प्रसिद्ध ग्लॅमर फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांनी शूट केलेले अमिताभ यांचे दुर्मिळ स्टुडिओ पोर्ट्रेट देखील लिलावात ठेवण्यात येणार आहेत. 

अमिताभ बच्चन यांचे चित्रपट

श्री. नटवरलाल,  द ग्रेट गॅम्बलर ,  कालिया ,  नसीब',  सिलसिला यांसारख्या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांची काम केलं आहे. चित्रपटांबरोबरच बिग बी हे काही कार्यक्रमांच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. ते कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात. अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्यांचे प्रोजेक्ट के आणि गणपत हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्यांच्या गणपत या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या टीझरमधील अमिताभ बच्चन यांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

इतर महत्वाच्या बातम्या:

Ganapath Teaser Out:जबरदस्त डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्स; 'गणपत' चा टीझर आऊट, बिग बींच्या लूकनं वेधलं लक्ष

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
Ravi Kishan Loses 18 Kg: नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट
नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Embed widget