बस्स इतकेच... दिवाळी बोनसवरून बिग बी चर्चेत, घरतल्या स्टाफला पाकीटासह मिठाईचे बॉक्स, नेटकऱ्यांच्या भलत्याच कमेंटस...
या व्हिडिओनंतर चाहत्यांची प्रतिक्रिया मात्र दोन गटांत विभागली गेली आहे, काहींनी अभिनेत्याचं कौतुक केलं, तर काहींनी नाराजी व्यक्त केलीय.

Amitabh Bacchan: दिवाळीनंतर काही दिवसांनी, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर सध्या त्यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात बिग बीकडून आपल्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिल्याचं दिसत आहे. मात्र, या व्हिडिओनंतर चाहत्यांची प्रतिक्रिया मात्र दोन गटांत विभागली गेली आहे, काहींनी अभिनेत्याचं कौतुक केलं, तर काहींनी नाराजी व्यक्त केलीय. (Diwali Bonus)
इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या क्लिपमध्ये एक कंटेंट क्रिएटर अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर एका कर्मचाऱ्याशी बोलताना दिसतो. त्या वेळी कॅमेरामध्ये मिठाईचे बॉक्स आणि लोकांना भेटवस्तू देतानाचे दृश्य टिपले गेले. व्हिडिओतील व्यक्ती सांगते, “हे अमिताभ बच्चन यांचे घर आहे, आणि हे मिठाई वाटत आहेत.”
10 हजार बोनस मिठाईचे बॉक्स
यानंतर कर्मचाऱ्याने स्पष्ट केलं की, त्यांना केवळ मिठाईच नाही, तर रोख स्वरूपात रक्कमही देण्यात आली आहे. “आम्हाला 10 हजार रुपये आणि मिठाईचा बॉक्स मिळाला,” असं त्याने सांगितलं. त्या पोस्टच्या कॅप्शनमध्येही नमूद करण्यात आलं की, अमिताभ बच्चन यांनी आपल्या घरातील कर्मचाऱ्यांना आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये बोनस आणि मिठाईची भेट दिली. मात्र या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
View this post on Instagram
नेटकऱ्यांच्या भलत्याच कमेंटस...
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया ओघाने आल्या. काहींनी अमिताभ बच्चन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची दिवाळी खास केल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं, तर काहींना दिलेली रक्कम त्यांच्या दर्जाच्या अभिनेत्याने दिल्यास फारच कमी वाटली. एका युजरने लिहिलं, “इतक्या मोठ्या स्टारकडून एवढंच? हे निराशाजनक आहे.” दुसऱ्याने कमेंट केली, “10 हजार रुपये काही मोठी रक्कम नाही, ते रोज इतकं खर्च करत असतील.”

अनेकांनी फक्त 10 हजार! शेम...यापेक्षा ते नक्कीच जास्त काही करू शकतात, बस 10 हजार ? अशा कमेंट्स केल्या आहेत. बॉलीवूडच्या सर्वात मोठ्या अभिनेत्याकडून घरातील कर्मचाऱ्याना मिठाईच्या बॉक्ससह 10 हजार रुपयांचे पाकीट देण्यात आल्याचं या व्हिडीओमध्ये म्हटलंय.























