Ira Khan Social Media Post : लग्नाच्या 4 महिन्यांतच आमिरची लेक हैराण,एकटेपणाचीही वाटू लागलीये भीती; नेमकं कारण काय?
Ira Khan Social Media Post : बॉलीवूड अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खान ही नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. पण नुकतीच ती तिच्या सोशल मीडियाच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
Ira Khan Social Media Post : आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खान (Ira Khan) ही सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. आयराने नुकतच सेलिब्रेटी फिटनेस ट्रेनर नूपुर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्नगाठ बांधली. अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. पण पुन्हा एकदा आयरा तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
आयराने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आयराने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर एकटेपणाविषयी भाष्य केलं आहे. लग्नाच्या 4 महिन्यांतच आयराने ही पोस्ट केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
आयराने तिच्या पोस्टमध्ये काय म्हटलं?
आयराने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं की, मी सध्या खूप घाबरले आहे. मला एकटेपणाची भीती वाटू लागलीये. मला लाचार होण्याची भीती वाटतेय. मी जगातल्या प्रत्येक वाईट गोष्टीला घाबरतेय (हिंसा, रोग) या सगळ्या गोष्टींची भीती वाटतेय. मी हरवण्याची भीती वाटतेय. मी गप्प बसण्याला घाबरते.
पुढे आयराने म्हटलं की, मी कधीकधी विसरते मी माझ्या आयुष्यात इकते सक्षम लोक आहेत की त्यांना माहितेय मी कधी रस्ता विसरले तर हेच लोक मला परत घेऊन येतील. सध्या आयराची ही पोस्ट बरीच चर्चेत आली आहे. दरम्यान आयरा कोणत्या मानसिक तणावातून तर नाही ना जात असा देखील प्रश्न अनेकांना पडला आहे.
View this post on Instagram
आयरा ही नुपूरला कशी भेटली होती? याबाबत तिनं एका मुलाखतीत सांगितले होते. यावेळी आयरा म्हणाली होती, मी 17 वर्षांची असताना पोपने मला फिटनेस ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली. मी त्याच्याकडे सुपरफिट व्यक्ती म्हणून बघत होते. मी त्याचं खूप कौतुक करायचे. त्यानंतर आमची मैत्री झाली आणि मग आम्ही एकमेकांना डेट करू लागलो.
View this post on Instagram