(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pushpa : साई पल्लवीची हुकस्टेप कॉपी करत अल्लू अर्जुनने मिळवलीय वाहवा! तुम्हाला माहितेय का?
Pushpa Hook Step : प्रत्येकजण पुष्पाच्या हुकस्टेपची नक्कल करत आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, ज्या हुकस्टेपमुळे अभिनेत्याचे खूप कौतुक होत आहे, ती हुकस्टेप कॉपी केलेली आहे.
Allu Arjun Hook Step Copied : साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ (Pushpa The Rise) या चित्रपटामुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटातील गाण्यांपासून ते प्रत्येक डायलॉगपर्यंत, सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. प्रत्येकजण त्याच्या हुकस्टेपची नक्कल करत आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, ज्या हुकस्टेपमुळे अभिनेत्याचे खूप कौतुक होत आहे, ती हुकस्टेप कॉपी केलेली आहे. होय, अल्लू अर्जुनआधी अभिनेत्री साई पल्लवीने (Sai Pallavi) ही प्रसिद्ध हुकस्टेप शूट केली आहे.
अल्लू अर्जुनच्या आधी, साई पल्लवीने मोठ्या पडद्यावर ही हुकस्टेप दाखवली आहे. साई पल्लवीने 'राउडी बेबी' या गाण्यात ही हुकस्टेप केली होती. या गाण्यात साई पल्लवी धनुषसोबत (Dhanush) जबरदस्त डान्स करताना दिसली होती. हे गाणेही प्रचंड हिट ठरले होते.
पहा गाणे :
अल्लू अर्जुनला आवडली हुकस्टेप
अल्लू अर्जुनने स्वतः आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, या स्टेपवर तो एका गाण्यात परफॉर्म करताना दिसणार आहे. पण, दिग्दर्शक सुकुमारला त्याची स्टाईल इतकी आवडली की, त्याने ही स्टेप पुष्पासोबत जोडली. आता जेव्हाही कोणी ‘पुष्पा’चा कोणताही डायलॉग रिक्रिएट करतात, तेव्हा ही हुकस्टेप करायला विसरत नाही. प्रेक्षकांमध्ये पुष्पाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे.
‘पुष्पा’ चित्रपट प्रदर्शित होऊन, एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. परंतु, दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता आणि चर्चा वाढत आहे. पुष्पाचे डायलॉग्स आणि स्टेप्स सगळ्यांच्याच आवडत्या बनल्या आहेत.
हेही वाचा :
- वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी अल्लू अर्जुन आला चित्रपटात, 'या' चित्रपटाने दिली खरी ओळख
- Photo: Allu Arjun, Thalapathy vijay यांच्या 'या' साऊथच्या चित्रपटांचे होणार हिंदीत रिमेक
- Pushpa Mistakes: महत्त्वाच्या सीनमध्येच मोठी गडबड, ‘पुष्पा’तील ‘या’ चुका तुमच्या लक्षात आल्या का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha