Allu Arjun : झुकेगा नहीं साला! 'पुष्पा 2'च्या रिलीजआधीच अल्लू अर्जुनने केली 'Pushpa 3'ची घोषणा
Allu Arjun on Pushpa 3 : अल्लू अर्जुन अभिनीत 'पुष्पा 2' (Pushpa 2) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या सिनेमाचा तिसरा भागदेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.
Allu Arjun : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 'पुष्पा' (Pushpa) रिलीज झाल्यापासून या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता अल्लू अर्जुन आणि पुष्पाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. झुकेगा नहीं म्हणत अल्लू अर्जुनने 'पुष्पा 2'च्या रिलीजआधी 'पुष्पा 3'ची घोषणा केली आहे.
'पुष्पा 2' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर 'पुष्पा : द रुल' (Pushpa : The Rule) ट्रेडिंगमध्ये आहे. आता बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अल्लू अर्जुनने 'पुष्पा 3' या सिनेमासंदर्भात भाष्य केलं आहे.
'पुष्पा 3' येणार? (Allu Arjun on Pushpa 3)
अल्लू अर्जुनने नुकतीच बर्लिन चित्रपट महोत्सवात हजेरी लावली. दरम्यान 'पुष्पा 3' या सिनेमाबद्दल बोलताना अल्लू अर्जुन म्हणाला,"पुष्पा 3'ची तुम्ही प्रतीक्षा करू शकता. आम्ही या कलाकृतीची फ्रेंचायजी बनवण्यास उत्सुक आहोत. अनेक नव्या कल्पनांचा आम्ही विचार करत आहोत. आता परदेशी सिनेप्रेमी आपला सिनेमा किती डोक्यावर घेतील हे पाहावे लागेल. कोणत्या पद्धतीचे सिनेमे पाहायला प्रेक्षकांना आवडतील याचा मला अभ्यास करायचा आहे".
View this post on Instagram
'पुष्पा 2' कधी रिलीज होणार? (Pushpa 2 Release Date)
'पुष्पा' हा सिनेमा 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली. देशभरात हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. आता या सिनेमाचा दुसरा भाग अर्थात 'पुष्पा 2' प्रदर्शनासाठी सज्ज आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'पुष्पा' या सिनेमाने जगभरात 350 कोटींची कमाई केली होती. आता या सिनेमाचा दुसरा भाग किती गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अल्लू अर्जुनआधी रश्मिका मंदानानेदेखील 'पुष्पा 3'बद्दल हिंट दिली आहे. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली होती,"ही कधीही न संपणारी गोष्ट आहे. याचा अंत कधीच होऊ शकत नाही. अत्यंत मजेशीर आहे". अल्लू अर्जुन सध्या 'पुष्पा 2'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमासह अभिनेत्याच्या आगामी कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या