Alia Bhatt: आलियाने शेअर केला बाळाचा फोटो; नेटकरी म्हणाले, 'ही राहा...'
नुकतेच आलियाने (Alia Bhatt) बाळांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
Alia Bhatt Shares Photo : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या घरी काही महिन्यांपूर्वी एका चिमुकलीचं आगमन झालं. आलियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही गूडन्यूज चाहत्यांना दिली. रणबीर आणि आलियाने त्यांच्या मुलीचं नाव 'राहा' असं ठेवलं आहे. नुकतेच आलियानं बाळांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. आलियाने शेअर केलेल्या या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
आलियाने शेअर केले फोटो
आलियाने एका बॅबी वेअर फॅशन ब्रँडच्या प्रमोशनसाठी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये तिने बाळांचे काही फोटो शेअर केले आहेत. आलियाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये 'राहा' आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
एका नेटकऱ्याने आलियाच्या पोस्टला कमेंट केली, 'मला वाटलं ही राहा आहे.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'ही तुझी मुलगी आहे का?' आलियाने बाळाचे फोटो शेअर केल्यानंतर काही वेळेतच या फोटोला हजारो लाइक्स मिळाले. आलियाने शेअर केलेल्या एका बाळाच्या फोटोला 383K लाइक्स मिळाले आहेत. तर एका फोटोला 110K लाईक्स मिळाले आहेत.
View this post on Instagram
आलिया आणि रणबीरने 14 एप्रिल 2022 रोजी लग्नगाठ बांधली. आलिया आणि रणबीरनं लग्नाआधी एकमेकांना पाच वर्ष डेट केले. ‘ब्रह्मास्त्र’ च्या सेटवर आलिया आणि रणबीरची पहिली भेट झाली.
आलियाचे आगामी चित्रपट
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा आलियाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आलियासोबतच रणवीर सिंह आणि धर्मेंद्र हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. आलिया आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज आहे. तिचा 'हार्ट ऑफ स्टोन' हा हॉलिवूड सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Alia Bhatt Breastfeeding : आलियाचा ब्रेस्टफिडींग करतानाचा फोटो व्हायरल, फोटो मागचं सत्य काय?