(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IMDB Rating : बॉक्स ऑफिस कलेक्शनपेक्षा बजेट जास्त; आयएमडीबीच्या शर्यतीत 'डार्लिंग्स' पहिल्या क्रमांकावर
IMDB : गेल्या काही दिवसांपासून अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडत आहेत.
IMDB Rating : ऑगस्ट महिन्यात अनेक बिग बजेट सिनेमे (Movies) प्रदर्शित झाले. पण बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात हे सिनेमे कमी पडले. यात 'लाल सिंह चड्ढा', 'रक्षा बंधन', 'दोबारा' अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. जाणून घ्या आयएमडीबी रेटिंगमध्ये या सिनेमाला किती रेटिंग मिळालं आहे.
डार्लिंग्स
डार्लिंग्स हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होती. आलियासह शेफाली शाह, विजय वर्मा, रोशन मैथ्यू आणि राजेश शर्मा या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत होती. आयएमडीबी रेटिंगमध्ये या सिनेमाला 6.6 रेटिंग मिळाले आहे.
लाल सिंह चड्ढा
आमिर खान आणि करीना कपूरचा 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला आहे. 180 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमाने फक्त 133.2 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा 'फॉरेस्ट गंप' या हॉलिवूड सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. आयएमडीबी रेटिंगमध्ये या सिनेमाला 5 रेटिंग मिळाली आहे.
रक्षा बंधन
'रक्षा बंधन' या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. या सिनेमानेदेखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली नाही. भावा-बहिणीच्या नात्यावर आधारित या सिनेमाने फक्त 68.14 कोटींचा गल्ला जमवला आहे. 80 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती. आयएमडीबी रेटिंगमध्ये या सिनेमाला 4.6 रेटिंग मिळाले आहे.
दोबारा
तापसी पन्नूच्या 'दोबारा' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 1.36 कोटींची कमाई केली आहे. आयएमडीबी रेटिंगमध्येदेखील हा सिनेमा मागे पडला आहे.
लायगर
विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेच्या 'लायगर' सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. या सिनेमाने जगभरात 33.12 कोटींची कमाई केली आहे. तर आयएमडीबी रेटिंगमध्ये या सिनेमाला 3.1 रेटिंग मिळाले आहे.
संबंधित बातम्या