Alia-Ranbir Diwali Pic: आलिया-रणबीरने फोटो शेअर करत चाहत्यांना दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा
Alia-Ranbir Diwali Pic: . दिवाळी निमित्ताने आलियाने रणबीरसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Alia-Ranbir Diwali Pic: आलिया भट्टने नुकतंच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रणबीरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्या गोड फोटोत आलिया आणि रणबीर एकमेकांकडे बघत आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट बॉलिवूडच्या हॉट कपल्सपैकी एक. गेल्या अनेक दिवसांपासून दोघेही लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. परंतु अद्याप दोघांचं लग्न झालेलं नाही. त्यामुळे रणबीर-आलियाच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्येही कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. रणबीर-आलियाचं लग्न बॉलिवूडमधील मोस्ट अवेटेड वेडिंग्सपैकी एक आहे.
आलियाने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव होत आहे. दिवाळी निमित्तने आलियाने रणबीरसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे चाहतेदेखील त्यांना कमेंट्सच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसून येत आहेत. रणबीर आणि आलियाची जोडी मागील तीन वर्षांपासून एकत्र आहे. रणबीर कपूरच्या वाढदिवशी त्यांनी त्यांच्या प्रेमाची अधिकृतरित्या कबुली दिली होती.
View this post on Instagram
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार अशा चर्चा मागील काही दिवसांपासून रंगलेल्या होत्या. त्यानंतर आलियाच्या आईने एका कार्यक्रमात यावर स्पष्टीकरण दिले होते. लग्नासंदर्भात 'सोनी राजदान' म्हणाल्या, "आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नासाठी मी देखील उत्सुक आहे. पण त्याला बराच वेळ आहे. भविष्यात दोघांचे लग्न होणारच आहे. पण अजून लग्नाची तारिख ठरलेली नाही".
Kangana Ranaut Viral Video: भर कार्यक्रमात जेव्हा कंगनाने करण जोहरला इग्नोर केलं, पहा व्हिडीओ