Al Pacino : 'गॉडफादर' फेम अभिनेता अल पचिनो 83 व्या वर्षी चौथ्यांदा झाला बाबा; 29 वर्षीय गर्लफ्रेंडने दिला मुलाला जन्म
Al Pacino : अभिनेता अल पचिनोने वयाच्या 83 व्या वर्षी आपल्या चौथ्या मुलाचं स्वागत केलं आहे.
Al Pacino Became Father At 83 : हॉलिवूड अभिनेता अल्फ्रेडो जेम्स पचिनो उर्फ अल पचिनो (Al Pacino) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्याने वयाच्या 83 व्या वर्षी आपल्या चौथ्या मुलाचं स्वागत केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अच पचिनोची गर्लफ्रेंड नूर अल्फल्लाहने (Noor Al Fallah) वयाच्या 29 व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला आहे.
अल पचिनोची गर्लफ्रेंड नूर प्रेग्नंट असल्याची बातमी गेल्या काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. अल आणि नूरने त्यांच्या लाडक्या लेकाचं नाव रोमन पचीनो ठेवलं आहे. सध्या अल पचिनो यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अल पचिनो आणि नूर अल्फल्लाहन 2022 पासून एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात व्हेनिसमधील फेलिक्स ट्रॅटोरिया येथील एका हॉटेलमध्ये दोघांना पहिल्यांदा
पहिल्यांदा एकत्र स्पॉट करण्यात आलं. या इटालियन हॉटेलमधील डिनसर डेटनंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली.
Al Pacino, 83, is a father for the fourth time, welcoming son Roman with Noor Alfallah. https://t.co/KwV9DoAho6
— Star Tribune (@StarTribune) June 15, 2023
अल पचिनोची गर्लफ्रेंड नूर अलफल्लाह कोण आहे? (Who Is Noor Al Fallah)
अल पचिनोची गर्लफ्रेंड नूर ही एका कुवेती अमेरिकन कुटुंबातील मुलगी आहे. अच पचिनोआधी तिचं नाव 78 वर्षीय लोकप्रिय गायक मिक जेगर यांच्यासोबत जोडलं गेलं होतं. त्यानंतर तिचं नाव 60 वर्षीय निकोलस बर्गग्रेन यांच्यासोबत जोडले गेले. त्यानंतर ती 91 वर्षीय सिने-निर्माते क्लिंट ईस्टवुडसोबत स्पॉट झाली.
अल पचिनो नूर आधी जॉन टेरंटला डेट करत होता. त्यावेळी त्यांना ज्युली नावाची मुलगी झाली. ज्युली आता 33 वर्षांची आहे. त्यानंतर 1997 ते 2003 यादरम्याळ अल पचिनोने डेव्हरली डी एंजेलोला डेट केलं. बेव्हरली डी'एंजेलो आणि अल पचीनो यांना अँटोन आणि ऑलिव्हिया ही जुळी मुलं आहेत. ही मुलं आता 22 वर्षांची आहे. दरम्यान अल पचिनो यांनी आता चौथ्या मुलाचं स्वागत केलं आहे.
अल पचिनो यांच्या सुपरहिट सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Al Pacino Movies)
अमेरिकन अभिनेता अल पचिनो हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने सिनेमे, मालिका आणि नाटकांसह माहितीपटांमध्ये काम केलं आहे. विनोदवीर म्हणून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. 'द आयरिशमॅन', 'द गॉडफादर','द डेविल्स एडवोकेट' आणि 'सेन्ट ऑफ अ वुमन' सारख्या सुपरहिंट सिनेमांत अल पचिनोने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
संबंधित बातम्या