एक्स्प्लोर

नौदल अधिकाऱ्यांच्या भावना दुखावल्याप्रकरणी अक्षय-ट्विंकलला नोटीस

रुस्तम चित्रपटातील गणवेशाचा लिलाव करुन नौदल अधिकाऱ्यांच्या भावना दुखावल्याप्रकरणी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

मुंबई : 'रुस्तम' चित्रपटात वापरलेल्या नौदलाच्या गणवेशाचा लिलाव केल्याप्रकरणी बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार आणि त्याची पत्नी, अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. 'सशस्त्र दल अधिकाऱ्यांच्या भावना दुखावल्याप्रकरणी' 11 संरक्षण अधिकारी आणि आठ इतर व्यक्तींनी ही नोटीस पाठवली आहे. लिलाव केलेला पोशाख 'ओरिजिनल नेव्हल युनिफॉर्म' असल्याचं सांगत अक्षय कुमारने अवमान केल्याचा दावा केला जात आहे. 11 संरक्षण अधिकाऱ्यांनी ही नोटीस पाठवली असून इतर आठ जणांमध्ये नौदल अधिकाऱ्याची पत्नी आणि सात निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 'सशस्त्र दलाच्या गणवेशासारखा असलेला हा पोशाख राष्ट्रीय सुरक्षेसाठी संभाव्य धोका आहे. गणवेशावर असलेली चिन्हं आणि बॅज निस्सीम सेवेचं द्योतक आहेत. त्यामुळे राष्ट्रविरोधी घटक त्याचा दुरुपयोग करु शकतात.' असं नोटिशीत म्हटलं आहे. वर्दीचा लिलाव करण्यात काहीच गैर नाही : अक्षय कुमार या नोटिशीची एक प्रत लिलाव करणारी संस्था 'सॉल्ट स्काऊट' आणि संरक्षण मंत्रालयाला पाठवण्यात आली आहे. गणवेशाचा लिलाव रोखण्याची मागणी अधिकाऱ्यांनी केली आहे. नौदलाच्या युनिफॉर्मबाबत अनादर दाखवत सशस्त्र दल अधिकारी, निवृत्त अधिकारी, आजी-माजी अधिकाऱ्यांच्या विधवा, त्यांचे कुटुंबीय यांच्या भावना दुखावल्याचा दावा नोटीशीत करण्यात आला आहे. नौदल अधिकारी के. एम. नानावटी यांच्या आयुष्यावर आधारित 'रुस्तम' हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. नानावटींनी पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्यानंतर त्यांच्यावर चाललेल्या खटल्याची कहाणी सिनेमात दाखवली होती. अक्षयकुमारने 26 एप्रिल रोजी या गणवेशाचा लिलाव सुरु केला. प्राण्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या एका एनजीओला ही रक्कम देण्यात येणार आहे. 26 मे रोजी संपणाऱ्या या लिलावाची बोली सध्या 2 लाख 35 हजारांवर पोहचली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Say No To Tezaab And Anil Kapoor Become Superstar: ज्या फिल्मला गोविंदा म्हणालेला 'NO', त्याच फिल्ममुळे अनिल कपूर बनले सुपरस्टार, 'धकधक गर्स'सोबत रोमान्स करुन 50 आठवडे गाजवलं थिएटर
ज्या फिल्मला गोविंदा म्हणालेला 'NO', त्याच फिल्ममुळे अनिल कपूर बनले सुपरस्टार, 'धकधक गर्स'सोबत रोमान्स करुन 50 आठवडे गाजवलं थिएटर
Nitesh Bhardwaj On Ramayana: 'आता ॲनिमलसारख्या फिल्म करू नकोस...'; टेलिव्हिजनच्या सुपरस्टार कृष्णानं टोचले रणबीर कपूरचे कान
'आता ॲनिमलसारख्या फिल्म करू नकोस...'; टेलिव्हिजनच्या सुपरस्टार कृष्णानं टोचले रणबीर कपूरचे कान
Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?
Actor Sudesh Berry On Pm Narendra Modi: 'पंतप्रधान मोदी विष्णुचे अवतार, मला त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचंय...'; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
'पंतप्रधान मोदी विष्णुचे अवतार, मला त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचंय...'; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget