एक्स्प्लोर
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर सिनेमा, प्रमुख भूमिकेत...
पहिला पोलिस अधिकारी ज्याला भारतीय सैन्याने किर्तीचक्राने सन्मानित केलं... ही असामान्य व्यक्ती म्हणजे देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल. याच अजित डोवाल यांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर साकारली जाणार आहे.
मुंबई : एक असा गुप्तहेर जो देशाच्या संरक्षणासाठी पाकिस्तानच्या लाहोरमध्ये सात वर्ष मुस्लीम बनून राहिला. एक असा भारतीय ज्याने पाकिस्तानला खुलेआम बलुचिस्तान हिसकावून घेण्याची धमकी दिली. पहिला पोलिस अधिकारी ज्याला भारतीय सैन्याने किर्तीचक्राने सन्मानित केलं... ही असामान्य व्यक्ती म्हणजे देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल. याच अजित डोवाल यांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर साकारली जाणार आहे. अजित डोवाल यांची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता हा बॉलिवूडचा खिलाडी आहे. होय, अक्षय कुमार हा अजित डोवाल यांची व्यक्तिरेखा साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे.
नीरज पांडे हा चित्रपट दिग्दर्शित करणार असून अक्षय कुमारची यात प्रमुख भूमिका आहे. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांच्या जीवनावर आधारित आहे. सिनेमाची कथा अजित डोवाल यांच्या कारकीर्दीच्या अवतीभवती फिरेल. सिनेमाच्या कथेवर काम सुरु झालं असून रिसर्च सुरु आहे. परंतु चित्रपट सुरु होण्यासाठी अजून वेळ आहे.
नीरज पांडे सर्वात आधी अजय देवगणसोबतचा 'चाणक्य' चित्रपट पूर्ण करेल, ज्याची घोषणा काही महिन्यांपूर्वीच झाली होती. अक्षयलाही त्याचे काही प्रोजेक्ट पूर्ण करायचे आहेत. परंतु या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्याआधी कथा फायनल करुन लॉक करुन ठेवण्याचा टीमचा इरादा आहे.
याआधी अक्षय कुमार आणि नीरज पांडे या जोडीने 'स्पेशल 26', 'बेबी' आणि 'रुस्तम' यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. नीरज पांडेने 'रुस्तम'ची निर्मिती केली होती. अक्षय कुमार लवकरच 'मिशन मंगल'मध्ये दिसणार असून तो 16 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटात परेश रावल यांची व्यक्तिरेखा अजित डोभाल यांच्याशी प्रेरित होती. आता सगळ्या गोष्टी जुळून आल्या की अक्षय कुमार लवकरच अजित डोवाल साकारताना दिसेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement