(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ganesh Chukkal : मनसे विभागप्रमुख गणेश चुक्कल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा, अक्षय कुमारच्या बहिणीच्या कंपनीने दाखल केली तक्रार
Fraud Case : विक्रोळी मनसे विभागप्रमुख गणेश चुक्कल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Fraud Case : विक्रोळी मनसे विभागप्रमुख गणेश चुक्कल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या बहिणीच्या कंपनीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर गणेश (Ganesh Chukkal) यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवईतल्या हिरानंदानी गार्डन्समधील एका इमारतीतील फ्लॅटच्या करारावरून अक्षयच्या बहिणीच्या कंपनीने गणेश चुक्कल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, या प्रकरणात गणेश चुक्कल यांनी कंपनीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
गणेश चुक्कल हे मनसेचे विक्रोळीचे विभागप्रमुख असून, आता त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवई हिरानंदानीमधील एका फ्लॅट संदर्भातील हे प्रकरण आहे. एका इमारतीतील फ्लॅट करारात फसवणुक झाल्याचा आरोप सदर कंपनीने केला आहे. मात्र, गणेश यांनी कंपनीचे हे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची बहीण अलका हिच्या खोट्या सह्या करून फसवणूक केल्याचा आरोप गणेश यांच्यावर करण्यात आला आहे. पवईतील हिरानंदानी भागात अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या बहिणीचा एक फ्लॅट असून, तो फ्लॅट तीन वर्षांच्या भाडे करारावर गणेश चुक्कल यांना देण्यात आला होता. या भाडेकरारानुसार गणेश चुक्कला यांना हा फ्लॅट रिकामा करायचा होता. मात्र, त्यांनी यास नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचले. यावेळी आपल्यात 3 नव्हे 30 वर्षांचा करार झल्याचा दावा चुक्कल यांनी केला. मात्र, अलका यांच्या वकिलाने असा कोणताही करार झाल्याचे फेटाळून लावले.
तर, गणेश चुक्कल (Ganesh Chukkal) यांनी संदर्भातील काही कागदपत्रे न्यायलयात सादर केली. मात्र, या कागदपत्रावरील आणि करारावरील सह्या खोट्या असल्याचे अलका यांच्या वकिलाने म्हटले आहे. यानंतर त्यांनी पवई आणि बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. तर, पवई येथे चुक्कल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधीही सदर प्रकरणात त्यांची चौकशी झाली होती. मात्र, आता एफआयआर दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे.
आपल्यावरील आरोप खोटे : गणेश चुक्कल
तर, या प्रकरणी गणेश चुक्कल यांनी कंपनीचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. आपण कोणतीही खोटी कागदपत्र सादर केली नाहीत, आपल्यावर लावले गेलेले आरोप खोटे असून, कोर्टात ते सिद्ध होतील, असे त्यांनी म्हटले आहे. सध्या अलका यांच्या तक्रारीनंतर पोलीस पुन्हा एकदा गणेश चुक्कल यांची चौकशी करणार आहेत.
हेही वाचा :