Akshay Kumar : अक्षय कुमारने रिलीज केलं 'सोरारई पोटरू'च्या हिंदी रिमेकचं फर्स्ट पोस्टर; नेटकरी म्हणाले,"काहीतरी ओरिजनल आणा"
Soorarai Pottru : 'सोरारई पोटरू'च्या हिंदी रिमेकची पहिली झलक अक्षय कुमारने शेअर केली आहे.
Akshay Kumar Soorarai Pottru : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारचे (Akhay Kumar) अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. आता दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याच्या 'सोरारई पोटरू'चा (Soorarai Pottru) हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारने नुकतच या सिनेमाचं फर्स्ट पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.
'सोरारई पोटरू'च्या हिंदी रिमेकचं फर्स्ट पोस्टर आऊट झालं असलं तरी अद्याप या सिनेमाचं नाव समोर आलेलं नाही. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हे पोस्टर चर्चेत असून सध्या या पोस्टरची चर्चा आहे. या पोस्टरमध्ये अक्षय कुमार पायलटच्या भूमिकेत दिसत आहे.
'सोरारई पोटरू'च्या हिंदी रिमेकचा फर्स्ट लुक चर्चेत
अक्षय कुमारने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना 'सोरारई पोटरू'च्या हिंदी रिमेकची पहिली झलक दाखवली आहे. पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"टेक ऑफसाठी आम्ही सज्ज आहोत. प्रोडक्शन नंबर 27 (अनटायटल) 1 सप्टेंबर 2023 रोजी जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित करण्यास आम्ही सज्ज आहोत".
View this post on Instagram
'सोरारई पोटरू'च्या हिंदी रिमेकमध्ये खिलाडीकुमारसह परेश रावल आणि राधिका मदानदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन सुधा कोंगारा करणार असल्याचे म्हटले जात आहे. अक्षयचा 'सेल्फी' बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला होता. त्यामुळे आता 'सोरारई पोटरू'चा हिंदी रिमेक बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अक्षय कुमारने 'सोरारई पोटरू'च्या हिंदी रिमेकचं पोस्टर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी अक्षयला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. आता पुन्हा रिमेक, सर काहीतरी ओरिजनल आणा, तुझं स्टारडम संपत चाललं आहे, ओटीटीवर रिलीज कर, 'सोरारई पोटरू'मध्ये अक्षयने कमाल केली होती त्यामुळे तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
'सोरारई पोटरू' या सिनेमाचं कथानक काय? (Soorarai Pottru Story)
'सोरारई पोटरू' हा सिनेमा एअर डेक्कनचे संस्थापक जीआर गोपीनाथ यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सामान्य माणसासाठी हवाई प्रवास कसा परवडणारा पर्याय बनेल असं स्वप्न जीआर गोपीनाथ यांनी पाहिलं होतं. या बायोपिकच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला होता. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
संबंधित बातम्या