Akshay Kumar : तामिळ ब्लॉकबस्टर ‘Soorarai Pottru’चा हिंदी रिमेक येणार, ‘खिलाडी’ अक्षय कुमार दिसणार मुख्य भूमिकेत!
Soorarai Pottru Hindi Remake : चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अक्षय कुमार (Akshay Kumar) याची निवड झाली आहे. बॉलिवूड स्टार गेल्या वर्षापासून निर्मात्यांशी चर्चा करत होता आणि त्याने या चित्रपटाला होकार दिला आहे.
![Akshay Kumar : तामिळ ब्लॉकबस्टर ‘Soorarai Pottru’चा हिंदी रिमेक येणार, ‘खिलाडी’ अक्षय कुमार दिसणार मुख्य भूमिकेत! Akshay Kumar to play lead role in Hindi remake of Soorarai Pottru Akshay Kumar : तामिळ ब्लॉकबस्टर ‘Soorarai Pottru’चा हिंदी रिमेक येणार, ‘खिलाडी’ अक्षय कुमार दिसणार मुख्य भूमिकेत!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/2/2017/08/24111650/Akshay-Kumar-New-Look-Photoshoot.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Akshay Kumar New Film : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारचे (Akshay Kumar) चित्रपट रिलीज आधीच चर्चेत येतात. सध्या अक्षय कुमार अनेक चित्रपटांची शूटिंग करत आहे. पण, आता त्याच्याशी संबंधित आणखी एक बातमी समोर येत आहे. तामिळ ब्लॉकबस्टर चित्रपट ' सूररई पोटरु'चा (Soorarai Pottru) हिंदी रिमेक बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अजय देवगण, हृतिक रोशन, जॉन अब्राहम आणि अक्षय कुमार यांसारख्या बॉलिवूडमधील आघाडीच्या नायकांचा यात मुख्य भूमिका घेण्याचा विचार केला जात असल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत. पण अखेरीस हा चित्रपट अक्षय कुमारच्या पदरात पडला आहे. आता अक्षय कुमार या चित्रपटात काम करणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अक्षय कुमार (Akshay Kumar) याची निवड झाली आहे. बॉलिवूड स्टार गेल्या वर्षापासून निर्मात्यांशी चर्चा करत होता आणि त्याने या चित्रपटाला होकार दिला आहे.
चित्रपटाची हिंदी आवृत्ती उत्तर भारताच्या पार्श्वभूमीवर सेट केली जाण्याची शक्यता आहे. तर, मूळ तामिळ चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे सुधा कोंगारा प्रसाद या बॉलिवूड रिमेकचेही दिग्दर्शन करणार आहेत. इमरान हाश्मीसोबतच्या त्याच्या नुकत्याच घोषित झालेल्या 'सेल्फी' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यावर अक्षय या चित्रपटाचे शुटिंग सुरु करणार आहे.
काय आहे कथानक?
सुर्या दिग्दर्शित ‘सूररई पोटरु’ हा एअर डेक्कनचे संस्थापक जीआर गोपीनाथ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट होता. जीआर गोपीनाथ एक असे पायलट होते, ज्यांनी सामान्य माणसासाठी हवाई प्रवास हा एक परवडणारा पर्याय बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. प्रेरणादायी बायोपिकने या उद्योगपतीच्या जीवनातील अनेक अज्ञात पैलूंवर प्रकाश टाकला आहे. या चित्रपटाला सिनेप्रेमींचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता.
अक्षय कुमारकडे चित्रपटांची रांग
दरम्यान, अक्षय कुमार 2022 मध्ये आणखी पाच चित्रपटांसाठी शूटिंग करणार आहे. 'सेल्फी' आणि 'सूररई पोटरु' रिमेक व्यतिरिक्त, त्याच्याकडे लंडनस्थित थ्रिलर चित्रपट देखील आहे. अली अब्बास जफरच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' नावाच्या अॅक्शन-कॉमेडी चित्रपटात तो टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या वर्षाच्या अखेरीस संजय पूरन सिंग चौहानच्या 'गोरखा' चित्रपटासाठी देखील शूटिंग सुरु होणार आहे.
हेही वाचा :
- Bigg Boss 15 Finale : रश्मी देसाई बिग बॉसमधून आऊट, रविवारी होणार महाअंतिम सोहळा
- Amol Kolhe : 'नथुराम'ची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे गांधींच्या चरणी; आत्मक्लेश करत व्यक्त केली दिलगिरी
- Raj Kundra : राज कुंद्राची इन्स्टाग्रामवर 'घर वापसी'; 'या' नावाने उघडलं अकाऊंट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)