Akshay Kumar: प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला खिलाडी अक्षय अनुपस्थित राहणार? व्हिडीओमुळे चर्चेला उधाण
Akshay Kumar:
Akshay Kumar: अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराचा (Ram Mandir) उद्धाटन सोहळा आज पार पडणार आहे . प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) , रणबीर कपूर, आलिया भट्ट (Alia Bhatt), विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Kartina Kaif) यांसारखे सेलिब्रिटी अयोध्येला रवाना झाले आहेत. पण राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्याला बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) उपस्थित राहणार नाही, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. अक्षयनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी असा अंदाज लावत आहेत, की अक्षय हा राम मंदिराच्या उद्धघाटन सोहळ्याला अनुपस्थित राहणार आहे.
अक्षयनं शेअर केला व्हिडीओ
रिपोर्टनुसार, जॉर्डनमध्ये टायगर श्रॉफसोबत 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. नुकताच अक्षयनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये अक्षयसोबतच टायगर श्रॉफ देखील दिसत आहे. व्हिडीओमध्ये अक्षय म्हणतो, "जगभरातील राम भक्तांसाठी आजचा दिवस खूप मोठा आहे. शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज की अयोध्येतील राम मंदिरातप्रभू श्रीरामा त्यांच्या घरी येत आहेत." अक्षयनं या व्हिडीओला कॅप्शन दिलं," श्री राम की प्राण प्रतिष्ठा के पावन दिन पर आप सब को अनेक शुभकामनाएँ,जय श्री राम"
अक्षयनं हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर आता सोशल मीडियावर अशी चर्चा होत आहे की, अक्षय हा प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अनुपस्थित राहणार आहे.
View this post on Instagram
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला 7000 हून अधिक लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील अनेक स्टार्सनाही या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. कतरिना, विकी, आलिया आणि रणबीर हे अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यांचे अयोध्येतील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: