Natya Parishad : नाट्यपरिषद आणि न संपणारे वाद... अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा अध्यक्ष कोण होणार? रंगकर्मींसह नाट्यप्रेमींना उत्सुकता
Akhi Bhartiya Marathi Natya Parishad : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लवकरच पार पडणार आहे.
Akhi Bhartiya Marathi Natya Parishad Latest Update : नाट्य परिषद आणि वाद हे न संपणारं समीकरण झालं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीनंतर नाट्यपरिषदेचा अध्यक्ष कोण होणार याची रंगकर्मींसह नाट्यप्रेमींना उत्सुकता लागली आहे.
नाट्यपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रशांत दामले (Prashant Damle) यांचे 'रंगकर्मी नाटक समूह पॅनल' 10 पैकी 8 जागा मिळवत विजय ठरले आहे. तर प्रसाद कांबळींच्या (Prasad Kambli) 'आपलं पॅनल'चे दोन उमेदवारदेखील विजयी झाले आहेत. आता या निवडणुकीनंतर नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक कधी पार पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक कधी पार पडणार?
नाट्यपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची नाट्यवर्तुळात चर्चा सुरू आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत नाट्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी अध्यपदाच्या निवडणूकीसंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले,"येत्या 29 एप्रिलला नाट्यपरिषदेच्या अध्यपदाच्या निवडणूकीसंदर्भात खास बैठक होणार आहे. या बैठकीत अध्यपदासाठीची निवडणूक कधी होईल हे ठरेल".
प्रशांत दामले, अजित भुरे की आणखी कोणी?
नाट्यपरिषदेचा अध्यक्षपदासाठी प्रशांत दामले आणि अजित भुरे यांचं नाव चर्चेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत दामले यांच्या 'रंगकर्मी नाटक समूह पॅनल'मधील सुशांत शेलारदेखील नाट्यपरिषदेचा अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. प्रशांत दामले यांच्या पॅनलमध्ये एका पेक्षा एक नाट्यकर्मींचा समावेश आहे. यात वैजयंती आपटे, विजय केंकरे, विजय गोखले, दिलीप जाधव, सविता मालपेकर, सुशांत शेलार, सयाजी शिंदे आणि विजय सूर्यवंशी यांचा समावेश आहे. त्यामुळे आता यापैकी कोण नाट्यपरिक्षदेच्या अध्यक्षपदी विराजमान होणार याकडे नाट्यसृष्टीचं लक्ष लागलं आहे. अध्यपदाच्या जागेवरुन 'रंगकर्मी नाटक समूह पॅनल'मधील उमेदवरांमध्ये नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे. नाट्यपरिषदेच्या निवडणुकीनंतर त्यांच्यात धुसपूस सुरू आहे.
नाट्यपरिषदेच्या अध्यक्षाचं नक्की काम काय असतं?
नाट्यपरिषदेचा अध्यक्षाला वर्षाच्या शेवटी एक दिमाखदार नाट्य संमेलन भरवावं लागतं. तसेच यशवंत नाट्यसंकुल सांभाळणं आणि वार्षिक पुरस्कार देण्याचं काम करावं लागतं. नाट्यकर्मींसह पडद्यामागच्या कलाकारांसाठी तसेच हौशी आणि प्रायोगिकसह व्यावसायिक रंगभूमीवरील रंगकर्मींसाठी विविध योजना आखण्याचे काम नाट्यपरिषदेच्या अध्यक्षाला करावं लागतं. रंगमंच कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम नाट्यपरिषदेचा अध्यक्षालाच करावं लागतं.
संबंधित बातम्या