एक्स्प्लोर

70 कोटींच्या बजेटमध्ये कमावले 343 कोटी; सिंघम किंवा गोलमाल नाही, तर 'हा' ठरला अजय देवगणचा ब्लॉकबस्टर सिनेमा

Ajay Devgn Blockbuster Movie: अजय देवगणचा एक चित्रपट असा आहे की, ज्याचं बजेट केवळ 70 कोटी होतं, पण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तब्बल 343 कोटी रुपये कमावले. विशेष बाब म्हणजे, हा चित्रपट एका मल्याळम चित्रपटाचा रिमेक होता. 

Ajay Devgn Bollywood Blockbuster Movie: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) अजय देवगणचा (Ajay Devgn) आगामी चित्रपट 'सिंघम अगेन' (Singham Again) लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रोहित शेट्टीनं (Rohit Shetti) केलं आहे. अजय देवगण व्यतिरिक्त या चित्रपटात करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan), दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार आणि अर्जुन कपूर 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा फराळ 'सिंघम अगेन'च्या रुपात थिएटरमध्ये मिळणार आहे. 1 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज केला जाणार आहे. सिंघम अगेनचं बजेट 350 कोटींहून अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का? अजय देवगणचा एक चित्रपट असा आहे की, ज्याचं बजेट केवळ 70 कोटी होतं, पण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तब्बल 343 कोटी रुपये कमावले. विशेष बाब म्हणजे, हा चित्रपट एका मल्याळम चित्रपटाचा रिमेक होता. 

तुम्ही ओळखलंत का? आम्ही अजय देवगणच्या कोणत्या चित्रपटाबाबत बोलत आहोत? आम्ही बोलत आहोत, अजय देवगणच्या 'दृष्यम 2' (Drishyam 2) बाबत. IMDb नुसार, अजय देवगणच्या दृश्यम 2 चे बजेट 70 कोटी रुपये होते, तर बॉक्स ऑफिसवर त्याची एकूण कमाई 343 कोटी रुपये होती. दृश्यम 2 ची कथा विजय साळगावकर या सामान्य माणसाभोवती फिरते, जो आपल्या कुटुंबाला हत्येच्या आरोपांमधून वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. या त्याच्या धडपडीत जे काही घडत जातं, ते चक्रावणारं आहे. 

अजय देवगणचा सुपरडुपर हिट 'दृश्यम 2' मल्याळम फिल्मचा रिमेक

भारतासह देश-विदेशात गाजलेला अजय देवगण अभिनीत सुपरडुपर हिट 'दृश्यम 2' एका मल्याळम फिल्मचा रिमेक आहे. आपल्यापैकी फार कमी लोकांना हे ठाऊक असेल. मल्याळम सुपरस्टार मोहन लाल यांचा हा चित्रपट याच नावानं 2021 मध्ये रिलीज झाला होता. पुढे त्याचा रिमेक बॉलिवूडमध्ये करण्यात आला. याचं दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केलं होतं. दृश्यम 2 मध्ये अजय देवगण, अक्षय खन्ना, तब्बू, इशिता दत्ता, मृणाल जाधव, रजत कपूर, कमलेश सावंत, सौरभ शुक्ला आणि श्रिया शरण लीड रोलमध्ये दिसून आले होते. तर, मल्याळण दृश्यम 2 चं दिग्दर्शन जीतू जोसफ यांनी केलं होतं. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर डायरेक्ट रिलीज करण्यात आली होती. 

'दृश्यम 2'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ 

सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट 'दृश्यम 2' 2022 साली प्रदर्शित झाला होता. यात अजय देवगण मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात तब्बू, श्रिया सरन देखील दिसल्या होत्या. 'दृश्यम 2' मध्ये अक्षय खन्नानं आयजी तरुण अहलावतची भूमिका साकारली होती. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

वडिलांना सुई, धागा देऊन टेलर बनवायचं होतं, पण 'त्यानं' बॉलिवूडमध्ये नाव कमावलं; एवढंच काय तर, मुलीलाही स्टार केलं; ओळखलंत का कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 10 March 2025Ravindra Dhangekar Join Shiv Sena | काँग्रेसला दे धक्का! रविंद्र धंगेकर यांच्या हाती धनुष्यबाणSpecial Report | Raj Thackeray Statement | कुंभस्नानावरुन वक्तव्य, वादाचा मेळा; संत-मंहतांची नाराजीRajkiya Shole | Special Report | Beed Crime | बीड जिल्ह्यात किती बॉस? किती आका? गुंडांना अभय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Embed widget