![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Aishwarya Rai : ऐश्वर्या रायच्या लेटेस्ट फोटोने वाढवला इंटरनेटचा पारा; सहा तासांत मिळाले लाखो लाईक्स
Aishwarya Rai Latest Photo : ऐश्वर्या राय बच्चनच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विश्वसुंदरीच्या लेटेस्ट फोटोने इंटरनेटचा पारा वाढवला आहे.
![Aishwarya Rai : ऐश्वर्या रायच्या लेटेस्ट फोटोने वाढवला इंटरनेटचा पारा; सहा तासांत मिळाले लाखो लाईक्स Aishwarya Rai Latest Photo Bollywood Actress Shared Stunning Pics From Cannes Film Festival Dressing Room in Latest Pics Loving Fans Know Bollywood Entertainment Latest Update Marathi News Aishwarya Rai : ऐश्वर्या रायच्या लेटेस्ट फोटोने वाढवला इंटरनेटचा पारा; सहा तासांत मिळाले लाखो लाईक्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/29/72e5c6557950b2e968af9e06da0550b11716958114579254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ऐश्वर्याने काही तासांपूर्वी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ऐश्वर्याच्या या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे. ऐश्वर्याने शेअर केलेला हा फोटो 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'च्या (Cannes Film Festival) तयारीदरम्यानचा आहे. अभिनेत्रीने ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो शेअर केला आहे. वयाच्या 50 व्या वर्षी अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री मेकअप आणि हेअरस्टाईल फ्लॉन्ट करताना खूपच स्टनिंग दिसत आहे.
ऐश्वर्याच्या फोटोला अवघ्या सहा तासांत दीड लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ऐश्वर्या राय बच्चनने चार फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसह तिने कॅप्शनमध्ये हार्ट आणि क्यूट इमोजी शेअर केला आहे. तसेच तिने आपला ब्रँड लॉरियललादेखील टॅग केलं आहे. लॉरियल ब्रँडसाठीच ऐश्वर्याने 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये हजेरी लावली होती.
ऐश्वर्याचे लेटेस्ट फोटो पाहिलेत का? (Aishwarya Rai Latest Photo)
ऐश्वर्याने इंस्टावर आपले चार फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत अभिनेत्री सुंदर पोज देताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत ती मस्कारा लावताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोत लिपस्टिक लावताना आरश्यात पोज देताना दिसत आहे. तर चौथ्या फोटोत तिने हेअरस्टाईल करताना पोज देत आहे. ऐश्वर्याचे हे फोटो लॉरियलच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. ऐश्वर्याच्या या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
View this post on Instagram
'कान्स 2024'मध्ये ऐश्वर्याचा जलवा
'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'मध्ये ऐश्वर्या राय दोन लूकमध्ये दिसून आली होती. पहिल्या दिवशी तिने काळा आणि क्रिम रंगाचा गाऊन परिधान केला होता. तर दुसऱ्या दिवशी निळा आणि चंदेरी रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला होता. 'कान्स 2024'च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याने आपल्या दोन्ही लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. ऐश्वर्या सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या-अभिषेकचा (Abhishek Bachchan) घटस्फोट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच तिच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या
Salman Khan : 'ऐश्वर्यासोबत काम करु नको', अभिषेकला सलमाननेच दिली होती धमकी; नेमकं काय घडलं होतं?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)