"मला खोटं बोलून, माझं नाव वापरलेलं मला आवडणार नाही..."; कोकण हार्टेड गर्ल संतापली, नेमकं घडलं काय?
Ankita Walawalkar Angry Post: 'बिग बॉस मराठी 5'मधून घराघरांत पोहोचलेली युट्यूबर कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर सध्या आपल्या लग्नाची शॉपिंग करत आहे. पण, सध्या ती एका कारणामुळे चर्चेत आहे.
Kokan Hearted Girl Ankita Walawalkar Angry Post: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) आणि 'बिग बॉस मराठी 5' (Bigg Boss Marathi 5) फेम लोकप्रिय युट्युबर कोकण हार्टेड गर्ल (Kokan Hearted Girl) अंकिता प्रभू वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) सध्या तिच्या लगीनघाईमुळे चर्चेत आहे. बिग बॉसचं (Bigg Boss) पाचवं पर्व संपल्यानंतर अंकितानं काही दिवसांतच तिच्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख सर्वांना करुन दिली. तसेच, ती फेब्रुवारीत आपली लग्नगाठ बांधणार असल्याचंही तिनं सांगितलं. मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसोबत (Kunal Bhagat) अंकिता वालावलकर लग्नगाठ बांधणार आहे. दोघांचीही लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे. पण, नुकतीच अंकिता एका इंन्स्टाग्राम व्हिडीओवरुन भलतीच संतापल्याचं पाहायला मिळालं. मला खोटं बोलून, माझं नाव वापरलेलं मला आवडणार नाही, असं अंकितानं निक्षून सांगितलं.
'बिग बॉस मराठी 5'मधून घराघरांत पोहोचलेली युट्यूबर कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर सध्या आपल्या लग्नाची शॉपिंग करत आहे. आपल्या काही पोस्टमधून ती आपल्या लग्नाच्या खरेदीबाबत अपडेट्स देत असते. अशातच किर्ती आर्ट अँड क्राफ्ट नावाच्या इन्स्टाग्राम हॅन्डलवरुन मुंडावळ्यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. "कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रभू वालावलकरच्या लग्नासाठी स्पेशल कस्टमाइझ्ड युनिक आणि नाजूक अशा मुंडावळ्या", अस मजकूर या व्हिडीओमध्ये लिहिण्यात आला आहे. तसेच, कॅप्शनमध्ये अंकिता वालावलकरला टॅगही करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि क्षणार्धात त्यावर अनेकांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला. अनेकांनी अंकिताला टॅग करुन कमेंट करायला सुरुवात केली. पण, अंकितानं मात्र, या गोष्टीवर संताप व्यक्त केला आहे. या मुंडावळ्या तिनं घेतलेल्या नाहीत, असं अंकितानं पोस्टवर कमेंट करत सांगितलं आहे.
View this post on Instagram
कमेंटमध्ये नेमकं काय म्हणाली अंकिता वालावलकर?
"मी फक्त एवढंच सांगेन की छान बिझनेस करा, पण खोटं बोलून करू नका. मला खोटं बोलून, माझं नाव वापरून बिझनेस केलेला मला आवडणार नाही. मी तुमच्याकडून मुंडावळ्या घेतलेल्या नाहीत. जे आमच्या लग्नासाठी खरंच मेहनत करत आहेत, त्यांना क्रेडिट मिळू द्या.", अशी कमेंट अंकितानं तिच्या लग्नासाठी मुंडावळ्या बनवल्याचा दावा करणाऱ्या पोस्टवर केली आहे.
दरम्यान, बिग बॉस मराठी सीझन 5 संपल्यापासून अंकिता आपल्या लगीनघाईमुळे चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर 12 ऑक्टोबरला अंकितानं आपल्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख सर्वांना तिच्या सोशल मीडिया हॅन्डल्सवरुन करुन दिली. त्यानंतर येत्या फेब्रुवारीत ते दोघे लग्न करणार असल्याचं अंकितानं जाहीर केलं. तसेच, अंकिता आणि कुणालचा शाही विवाह सोहळा कोकणात पार पडणार असल्याचंही तिनं सांगितलं होतं. सध्या दोघेही लग्नाची तयारी आणि शॉपिंग करण्यात व्यस्त आहेत. अंकिताचा होणारा नवरा कुणाल भगतबाबत बोलायचं तर, कुणाल मराठी संगीत दिग्दर्शक आहे. तो गायक आणि लेखकही आहे. कुणालनं अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांसाठी संगीत दिग्दर्शनाचं काम केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :