एक्स्प्लोर
आमीरनंतर आता सलमान तरुण मुलीच्या वडिलांच्या भूमिकेत!
मुंबई : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानचा 'दंगल' पाहिल्यानंतर दबंग सलमान खान त्याच्या इमेजवर साहसी प्रयोग करण्याच्या तयारीत आहे. 'दंगल'मध्ये चार मुलीच्या वडिलांची दमदार भूमिका साकारलेल्या आमीरचा सर्वाधिक प्रभाव सलमान खानवर पडलेला दिसत आहे. सलमानने असा सिनेमात साईन केला आहे, ज्यात तो 13 वर्षांच्या मुलीच्या पित्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत 51 वर्षीय सलमान खानला विचारलं होतं की, "तो ऑनस्क्रीन वडिलांची भूमिका करणार का?" यावर सलमान म्हणाला की, "हो नक्कीच, 30 वर्षांच्या वयातही मी 'जब प्यार किसी से होता है' या सिनेमात वडिलांची भूमिका साकारली होती. आगामी सिनेमात मी एका 13 वर्षांच्या मुलीच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट डान्सवर आधारित असेल. या सिनेमासाठी मला उत्तम डान्सर बनायचं आहे."
आता हा सिनेमा कोणता, त्याचं नाव काय हे नंतर स्पष्ट होईल. तोपर्यंत सलमान खानच्या चाहत्यांना त्याच्या 'ट्यूबलाईट'ची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कबीर खान दिग्दर्शित ट्यूबलाईटमध्ये सलमान काम करत आहे. विशेष म्हणजे यात चीनी अभिनेत्री सलमानसोबत दिसणार आहे.
'ट्यूबलाईट' हा सिनेमा साठच्या दशकातील सीमेपारच्या प्रेमकहाणीवर आधारित असेल. याची पार्श्वभूमी भारत-चीन युद्धाची असेल, असं म्हटलं जात आहे.
दरम्यान, 2016 हे वर्ष अभिनेता सलमान खानसाठी जबरदस्त ठरलं. आता 2017 मध्येही तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी तयार आहे. सलमान खानचा 'सुलतान' प्रेक्षकांसह समीक्षकांनाही पसंती दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement