एक्स्प्लोर
'ऐ दिल..'मधल्या 'त्या' संवादामुळे रफींचा अपमान, मुलाचा आरोप
मुंबई : पाकिस्तानी कलाकार फवाद खानच्या भूमिकेमुळे वादग्रस्त ठरलेला करण जोहरचा 'ऐ दिल है मुश्किल' हा सिनेमा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमातील एका संवादामुळे सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांचा अपमान होत असल्याचा आरोप रफींचे पुत्र शाहीद रफी यांनी केला आहे.
दिग्दर्शक करण जोहरने जाहीर माफी मागावी, तसंच सिनेमातील हा प्रसंग काढून टाकावा अशी मागणी शाहीद रफी यांनी केली आहे. 'मोहम्मद रफी गाते नही, रोते थे' अशा आशयाचा एक संवाद चित्रपटात अनुष्काच्या ओठी आहे. विशेष म्हणजे 'ऐ दिल है मुश्किल' या करण जोहरच्या चित्रपटाचं नावसुद्धा मोहम्मद रफी यांच्याच एका गाजलेल्या गाण्यावरुन ठेवण्यात आलं आहे.
'मोहम्मद रफी हे भारतातील एक महान गायक होते. आज त्यांच्या निधनाला 25 वर्ष उलटूनही त्यांची गाणी लोकप्रिय आहेत. त्यांच्या गाण्यांचे ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. असं असताना करण जोहरसारख्या दिग्दर्शकानं त्यांचा असा अपमान का करावा' असा सवाल शाहीद रफी यांनी विचारला आहे.
ऐन दिवाळीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. मात्र त्याच्या प्रदर्शनापूर्वी मोठा वादंग निर्माण झाला होता. पाकिस्तानी कलाकार फवाद खानला मनसेने केलेल्या विरोधामुळे आणि नंतर हिरवा कंदील दाखवल्यामुळे हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला होता.
संबंधित बातम्या :
मनसेच्या 5 कोटींच्या मागणीला माझा विरोधच होता : मुख्यमंत्री
ऐ दिल.. वादः मनसेने तोडपाणी केल्याची शंका : अजित पवार
फडणवीसांनी 5 कोटींना देशभक्ती विकत घेतली : शबाना आझमी
सैन्याला स्वत:चा स्वाभिमान, खंडणीचा पैसा नको, उद्धव यांचा राज ठाकरेंना टोला
…म्हणून ‘ऐ दिल है मुश्किल’ला परवानगी : राज ठाकरे
‘ऐ दिल है मुश्किल’चा तिढा सुटला, सिनेमा रिलीज होणार
मनसेच्या आंदोलनांवर अभिनेत्री रेणुका शहाणेंची फेसबुक पोस्ट
मनसे गुंडांचा पक्ष, केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियोंचा हल्लाबोल
‘ऐ दिल..’च्या प्रदर्शनासाठी करण जोहर राजनाथ यांच्या दारी
मनसेचे मल्टिप्लेक्समधील कामगारही पाक कलाकारांविरोधात
माजी क्रिकेटर संजय मांजरेकरची मनसेवर बोचरी टीका
यापुढे पाक कलाकारांना सिनेमात घेणार नाही : करण जोहर
मोदींकडून माफीची मागणी केलीच नव्हतीः अनुराग कश्यप
पाकिस्तानी कलाकारांबाबत मुकेश अंबानी म्हणतात…
पाक कलाकारांबाबत आमीरची पत्नी म्हणते…
‘ऐ दिल..’ प्रदर्शित केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा
मोदीजी, पाकिस्तान दौऱ्याबाबत माफी कधी मागताय? : अनुराग कश्यप
भारत-पाक संबंधांवरुन फिल्मस्टारच टार्गेट का? : प्रियंका
माहिरा खानची ‘रईस’मध्ये रिप्लेसमेंट नाही, निर्मात्याचे संकेत
‘ऐ दिल..’मध्ये फवादच्या चेहऱ्यावर ‘या’ हिरोचा मुखवटा
पाक कलाकार असलेले चित्रपट दाखवणार नाही, सिंगल स्क्रीन थिएटर मालकांचा निर्णय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement