Adipurush Poster Release: 'संस्कृतीची चेष्टा...'; आदिपुरुष चित्रपटाच्या पोस्टरला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
दिग्दर्शक ओम राऊतनं (Om Raut) आदिपुरुष या चित्रपटाचं नवं पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरला कमेंट करुन अनेकांनी आदिपुरुष या चित्रपटाला ट्रोल केलं आहे.
Adipurush Poster Release: काल (30 मार्च) राम नवमी दिवशी अभिनेता प्रभासच्या (Prabhas) आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाचं नवं पोस्ट प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. दिग्दर्शक ओम राऊतनं (Om Raut) आदिपुरुष या चित्रपटाचं हे नवं पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधलं आहे. आता काही नेटकरी आदिपुरुष या चित्रपटाच्या या नव्या पोस्टरला ट्रोल करत आहेत.
ओम राऊतनं शेअर केलेल्या आदिपुरुष या चित्रपटाच्या पोस्टमध्ये प्रभास हा श्री रामाच्या भूमिकेत दिसत आहे तर क्रिती सेनन ही सीतेच्या भूमिकेत दिसत आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हा आदिपुरुष या चित्रपटात रामभक्त हनुमानाची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता सनी सिंह हा लक्ष्मण ही भूमिका साकारत आहे. ओम राऊतनं आदिपुरुष चित्रपटाचा पोस्टर शेअर केल्यानंतर त्या पोस्टरला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
ओम राऊतच्या पोस्टला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी आदिपुरुष या चित्रपटाच्या पोस्टरला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं आदिपुरुष या चित्रपटाच्या पोस्टरला कमेंट केली, 'प्लिज, संस्कृतीची चेष्टा करु नका.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, '100 टक्के फ्लॉप'
'लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यानं डिझायनर लेदर स्ट्रीप घातलं आहे. ' अशी देखील कमेंट एका नेटकऱ्यानं केली. तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'क्रिती सीतेसारखी दिसत नाहीये.'
View this post on Instagram
प्रभासचा 'आदिपुरुष' आधी 11 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण काही कारणाने या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. रिलीज डेट पुढे ढकलल्यानंतर हा सिनेमा 2023 मध्ये रिलीज करण्यात येईल असे सांगण्यात आले. पण अखेर आता हा सिनेमा येत्या 16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'आदिपुरुष' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या व्हीएफएक्सवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तसेच या चित्रपटातील सैफच्या लूकवरूनही वाद निर्माण झाला. अनेकांनी सैफच्या लूकवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या: