Urvashi Rautela : भारत-पाकिस्तान सामन्यात अभिनेत्री उर्वशी रौतेलाची हजेरी! सोशल मीडियावर ट्रोल होतेय अभिनेत्री
Urvashi Rautela : उर्वशी रौतेला रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना पाहण्यासाठी दुबईला पोहोचली होती. मात्र, अभिनेत्रीला स्टेडियममध्ये पाहताच चाहते आश्चर्यचकित झाले होते.
Urvashi Rautela : भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यातील आशिया चषकाचा दुसरा सामना दुबईत पार पडला. टीम इंडियाने हा सामना पाच विकेटने जिंकला. भारत विरुद्ध पाकिस्तानचा हा सामना पाहण्यासाठी कलाकारही दुबईला पोहोचले होते. साऊथ चित्रपटांचा सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) सामना सुरू होण्यापूर्वी मैदानात दिसला होता. त्याचवेळी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये दिसली. उर्वशी रौतेला ही ऋषभ पंतची एक्स गर्लफ्रेंड असल्याचे नेहमीच बोलले जाते. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचेही अनेकदा बोलले गेले होते. मात्र, उर्वशी आणि पंत यांनी याबाबत नेहमीच मौन बाळगले.
उर्वशी रौतेला रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना पाहण्यासाठी दुबईला पोहोचली होती. मात्र, अभिनेत्रीला स्टेडियममध्ये पाहताच चाहते आश्चर्यचकित झाले होते. अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोलही करायला सुरुवात केली. यावेळी उर्वशी (Urvashi Rautela) अतिशय गंभीरपणे मॅच पाहताना दिसली. मात्र, आता युजर्स उर्वशीला तिच्या जुन्या वक्तव्यांची आठवण करून देऊ लागले आहेत. उर्वशीला स्टेडियममध्ये पाहून सोशल मीडियावर पुन्हा एकदा मीम्सचा पाऊस पडू लागला आहे.
नेमकं कारण काय?
उर्वशी रौतेलाने काही दिवसांपूर्वी चाहत्यांसाठी ‘आस्क मी एनीथिंग’ सेशन केले होते. यादरम्यान काही युजर्सनी उर्वशीला तिचा आवडता क्रिकेटर कोण असा प्रश्न केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली की, ती क्रिकेट पाहत नाही. तिने लिहिले की, 'मी क्रिकेट बघत नाही. मी एकाही क्रिकेटपटूला ओळखत नाही. पण, मी सचिन तेंडुलकर सर आणि विराट कोहली सरांचा खूप आदर करते.’
पाहा मीम्स :
पंतसोबतच सोशल मीडिया वॉर!
अलीकडेच ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि उर्वशी (Urvashi Rautela) सोशल मीडियावर एकमेकांशी भिडले होते. पंतने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी टाकून उर्वशीचे नाव न घेता आपल्याला फॉलो करणे थांबवण्यासाठी विनंती केली होती. त्यानंतर उर्वशीने इंस्टाग्रामवर एक पोस्टही केली. तिनेही त्यात पंत याचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले होते. ऋषभने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्याने कोणाचेही नाव घेतले नव्हते. ऋषभने लिहिले की, 'प्रसिद्धी आणि बातम्या मिळविण्यासाठी काही लोक मुलाखतीत खोटे कसे बोलू शकतात? हे विचित्र आहे. काही लोकांना नाव कमावण्याची आणि प्रसिद्ध होण्याची इतकी भूक असते, हे दुःखद आहे. ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो. या पोस्टसोबतच्या हॅशटॅगमध्ये ऋषभने लिहिले होते की, 'पिच्छा सोड ताई’, ‘खोट्याला मर्यादा असते’. मात्र, काही वेळाने त्याने ही स्टोरी डिलीट केली.
हेही वाचा :