एक्स्प्लोर

Pranitha Subhash : मुलगी झाली हो! अभिनेत्री प्रणिता सुभाषच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

Pranitha Subhash : शुक्रवारी, 10 जून 2022 रोजी, सुंदर अभिनेत्री प्रणिताने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या बाळाच्या जन्माची घोषणा करताना काही फोटो शेअर केले आहेत.

Pranitha Subhash : अभिनेत्री प्रणिता सुभाषने (Pranitha Subhash) शुक्रवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला. साऊथ स्टार प्रणिताने तिच्या हॉस्पिटलच्या खोलीतील स्वतःचा आणि मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्री प्रणिता सुभाष कन्नड, तेलगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये दिसली आहे. आता आई झाल्यावर प्रणितावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शुक्रवारी, 10 जून 2022 रोजी, सुंदर अभिनेत्री प्रणिताने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या बाळाच्या जन्माची घोषणा करताना काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर पडली आहे. पहिल्या फोटोमध्ये ती आपल्या बाळाला कुशीत घेऊन तिच्याकडे पाहत आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या फोटोमध्ये ती हॉस्पिटलच्या डॉक्टरांसोबत पोज देत आहे. फोटो शेअर करताना प्रणिताने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आमच्या मुलीचा जन्म झाल्यापासून, गेले काही दिवस अनोखे होते. ही जन्मकथा तुम्हा सर्वांना सांगण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहत आहे.’ प्रणिताने अद्याप तिच्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही.

चाहते आणि सेलिब्रिटी करतायत अभिनंदन!

सोशल मीडियाद्वारे प्रणितावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पोस्टवर कमेंट करताना, प्रकाश राज यांच्या पत्नी कोरिओग्राफर पोनी प्रकाश राज यांनी लिहिले, ‘अभिनंदन, मातृत्वात स्वागत आहे.’ यासह अनेक चाहत्यांनीही अभिनेत्रीचे अभिनंदन केले.

व्यावसायिकाशी बांधली लग्नगाठ

प्रणिताने गेल्या वर्षी 30 मे 2021 रोजी बेंगळुरूस्थित बिझनेसमन नितीन राजू यांच्याशी लग्न केले होते आणि तिने 1 जून रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या लग्नाची माहिती दिली होती. एका खाजगी समारंभात त्यांचे लग्न झाले होते. नितीनच्या 34व्या वाढदिवशी, अभिनेत्रीने तिच्या पहिल्या बाळाच्या आगमनाची आनंदाची बातमी शेअर केली होती. प्रणिता सुभाषच्या करिअरबद्दल बोलायचे झाले, तर तिने तेलुगूमध्ये 'बावा' (2010) या चित्रपटातून पदार्पण केले. यामधून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. नंतर ती 2013 मध्ये रिलीज झालेल्या तेलुगु फिल्म ‘अत्तारिंटिकी दरेडी’, ‘हंगामा 2 ‘ आणि ‘ब्रह्मोत्सवम’सारख्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसली होती.  

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
Maharashtrachi Hasya Jatra 8 Years: हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget