Deepali Sayed on Maharashtra Epstein Files: खरातला वाचवण्यासाठी सेन्सॉर बोर्डवर प्रेशर आणताय का? संतापलेल्या दिपाली सय्यद यांचा सवाल, रुपाली चाकणकरांनाही सुनावलं, म्हणाल्या...
Deepali Sayed Questions Rupali Chakankar: 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स'च्या वादावर दिपाली सय्यद यांची रोखठोक प्रतिक्रिया

Maharashtra Epstein Files Controversy: 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' (Maharashtra Epstein Files) या सिनेमाची सध्या बरीच चर्चा रंगली आहे. या सिनेमातील बऱ्याच कलाकारांचे चेहरे रिव्हिल झाले आहेत. ट्रेलर रिलीज होताच, या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या सिनेमात मनोज जोशी (Manoj Joshi), दिपाली सय्यद Deepali Sayed, सुबोध भावे यासह इतर दिग्गज कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमावर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आक्षेप घेतला. तसेच सिनेमा आणि सिनेमातील स्टारकास्टला नोटीस पाठवली. रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' (Maharashtra Epstein Files Movie) सिनेमाच्या निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांना 25 कोटी रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली होती. दिपाली सय्यद सध्या चर्चेत आहेत. अलिकडेच त्यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर तसेच 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स'या सिनेमाच्या संबंधित अनेक गोष्टींवर चर्चा केली.
दिपाली सय्यद 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' (Deepali Sayed Breaks Silence on Maharashtra Epstein Files Controversy)
दिपाली सय्यद यांनी अलिकडेच 'लोकशाही मराठी'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत दिपाली सय्यद म्हणाल्या की, 'महिलांचं तिथे जाण्याचं कारण म्हणजे, त्यांना कोणतातरी प्रॉब्लेम आला असेल, मेण्टली कोणतीतरी खंत असेल, घरात प्रॉब्लेम असतील. तेव्हा एखादा व्यक्ती मार्ग शोधतो आणि तिथे जातो. मार्ग शोधत असताना, तिथे गेल्यानंतर तुम्ही जेव्हा गुरुकडून अपेक्षा ठेवता. गुरुकडून काही सांत्वन किंवा गुरु काहीतरी तोडगा काढतील. पण तसं झालं नाही. तसं न होता, काहीतरी वेगळं झालं'.
'तुम्ही महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. तेव्हा तुम्ही काहीही करु शकला असता. पण तुम्ही त्या माणसाबद्दल एकदाही बोलला आहात का? आजही, हा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर असतानाही, तुम्ही त्या माणसाबद्दल बोलला आहात का? तुम्ही स्वत:बद्दल स्पष्टीकरण देताय, मी असं केलं, तसं केलं, मी असं नाही केलं, तसं नाही केलं... अरे त्या माणसाने काय केलं ते सांगा ना, त्या माणसाने वाट लावली ना. अशी माणसं पुन्हा महाराष्ट्रमध्ये यायला हवी का? तर, नाही यायला पाहिजेत. त्यासाठी हा प्रयत्न आहे. आम्ही म्हटलं का तुम्ही काही केलं आहे? आम्ही असं कधी म्हटलं नाही. तुम्हीच गाजावाजा करत आहात', असं दिपाली सय्यद म्हणाल्या.
'आता ट्रेडमार्क, सेन्सॉरबोर्डमध्ये त्रास देत आहात. काही दिवसांपूर्वी स्वरुप (दिग्दर्शक) सांगत होता की, तो गेला होता. तिथे त्याला सांगण्यात एक बाई येऊन इथे बसते सतत. एवढं प्रेशर देत आहेत. का आणि कशासाठी? त्या खरातला वाचवण्यासाठी? आम्हाला अजून सिनेमाचं स्क्रिनिंग करु दिलं नाही', असं दिपाली सय्यद म्हणाल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















