एक्स्प्लोर
अभिनेत्री नर्गिस फाक्रीचं लिव्ह इन पार्टनरशी ब्रेकअप?
बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाक्री आणि हॉलिवूड संगीतकार मॅट अलांजो लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते, मात्र दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत
मुंबई : रणबीर कपूरसोबत 'रॉकस्टार' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री नर्गिस फाक्री चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्याबाबतच जास्त चर्चेत राहिली आहे. आधी अभिनेता उदय चोप्रासोबत झालेलं तिचं कथित ब्रेकअप गाजत असतानाच आता हॉलिवूडमधील संगीतकार मॅट अलांजोपासूनही ती विभक्त झाल्याचं म्हटलं जात आहे.
उदय चोप्रा आणि नर्गिस फाक्री एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा काही महिन्यांपूर्वी रंगल्या होत्या. इतकंच काय, नर्गिस फाक्री प्रेग्नंट असल्याची चर्चाही ऑगस्ट 2017 मध्ये रंगली होती. नर्गिस आणि उदय विवाहबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जात होतं. उदयच्या मातोश्री अर्थात पॅमेला चोप्रा यांनी विवाहाला मंजुरीही दिली होती. मात्र अचानक काहीतरी बिनसलं आणि नर्गिस परदेशी निघून गेली, तर उदयनेही आपलं नर्गिससोबत अफेअर असल्याच्या चर्चा धुडकावल्या.
नर्गिस आणि हॉलिवूड संगीतकार मॅट अलांजो लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये असल्याचं म्हटलं जात होतं. नर्गिसने याविषयी जाहीर कबुली दिली नसली तरी 2017 पासून दोघं लॉस अँजेलसमध्ये एकत्र राहत होते. यावर्षी लग्न करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता, मात्र सारं काही आलबेल असताना त्यांचं ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली.
नर्गिसने मॅट अलांजोसोबत सर्व फोटो डिलीट केले आहेत आणि त्याला अनफॉलोही केलं आहे. विशेष म्हणजे दोघांनी आपल्या मनगटावर सेम-सेम टॅटूही केला होता. मात्र आता दोघांनीही आपल्या वाटा वेगळ्या केल्याचं दिसत आहे.
नर्गिसने रॉकस्टारनंतर मद्रास कॅफे, मै तेरा हिरो, अजहर, बँजो यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. लवकरच ती संजय दत्तसोबत 'तोरबाज' या चित्रपटात झळकणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement