Megha Dhade: 'बिग बॉस मराठी' फेम मेघा धाडेची राजकारणात एन्ट्री; भाजपामध्ये केला प्रवेश
मेघानं भारतीय जनता पार्टीमध्ये (Bharatiya Janata Party) प्रवेश केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मेघानं ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
Megha Dhade: 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री मेघा धाडेनं (Megha Dhade) राजकारणात एन्ट्री केली आहे. मेघानं भारतीय जनता पार्टीमध्ये (Bharatiya Janata Party) प्रवेश केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मेघानं ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
मेघा धाडेनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रिया बेर्डे हे देखील दिसत आहे. मेघानं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, 'नमस्कार वंदे मातरम ! मला आपणास सगळ्यांना कळवण्यास अत्यंत आनंद होतोय की , तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छांनी मी माझा आवडता आणि जगातला सगळ्यात मोठा बलशाली पक्ष म्हणजेच भारतीय जनता पार्टीत रीतसर प्रवेश केला आहे. हे मी माझे अहोभाग्य समजते की, काल ज्यांच्या उपस्थितीत माझी प्रवेश प्रक्रिया पार पडली ते भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब , महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री विक्रांत जी पाटील , महामंत्री श्री विजयजी चौधरी व सांस्कृतिक प्रकोष्टच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीमती प्रियाताई बेर्डे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने हा प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम पार पडला. आता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली छान कामगिरी करून दाखवायचीआहे . समाजसेवेसाठी घेतलेल्या व्रताचे आता पुरेपूर पालन करायचे आहे. एका सुदृढ आणि सुशिक्षित सुसंस्कृत समाजाचं जे आपलं ध्येय आहे ते घेऊन आता जोमात कामाला लागायचा आहे , तेव्हा तुम्हा सगळ्यांचे ही आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम माझ्यासोबत असू द्या हीच विनंती आणि अपेक्षा आहे.धन्यवाद . जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय'
View this post on Instagram
मेघा ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनची विजेती ठरली. तसेच मेघानं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिनं हिंदी बिग बॉसच्या 12 सीझनमध्ये देखील सहभाग घेतला होता.
अभिनेता सौरभ गोखले यानं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. लवकरच सौरभ हा फैजी या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. राधा हाय बावरी या मालिकेमुळे सौरभला विशेष लोकप्रियता मिळाली.
इतर महत्वाच्या बातम्या: