एक्स्प्लोर

अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्यांचा कारावास

कोयना मित्राने दिलेला तीन लाखांचा चेक बाऊन्स झाल्याची तक्रार मॉडेल पूनम सेठीने दिली होती. त्यानंतर दंडाधिकारी कोर्टाने कोयनाला सहा महिन्यांचा कारावास सुनावला.

मुंबई : चेक बाऊन्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्यांचा कारावास सुनावण्यात आला आहे. मॉडेल पूनम सेठीच्या तक्रारीनंतर कोयनाला 1.64 लाखांच्या व्याजासह 4.64 लाख रुपये देण्याचे आदेश दंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत. पूनम सेठीने 2013 साली कोयना मित्राविरोधात तक्रार दाखल केली होती. बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे कोयनाने दिलेला चेक बाऊन्स झाला होता. कोयनाने मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावत वरच्या कोर्टात आव्हान देण्याची तयारी दर्शवली आहे. कोयनाने पूनमला वेगवेगळ्या वेळी एकूण 22 लाख रुपये दिले होते. त्यापैकी तीन लाखांचा चेक बाऊन्स झाला होता. त्यानंतर पूनमने 19 जुलै 2013 रोजी कोयनाला कायदेशीर नोटीसही बजावली होती. मात्र तरीही रक्कम न दिल्यामुळे पूनमने 10 ऑक्टोबर 2013 रोजी कोयनाविरोधात कोर्टात केस दाखल केली. दरम्यान, पूनम सेठी 22 लाख रुपये उधार देऊ शकेल, इतकी तिची ऐपतच नाही, असा दावा करत कोयनाने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले. इतकंच नाही, तर पूनमवर आपले चेक चोरल्याचा आरोपही तिने केला. मात्र कोयनाचे सर्व आरोप कोर्टाने फेटाळून लावले. मूळ कोलकात्याची असलेली 40 वर्षीय कोयना 2001 मध्ये ग्लॅडरॅग्ज मेगा मॉडेल इंडिया स्पर्धेची विजेती ठरली होती. 2002 साली राम गोपाल वर्माच्या 'रोड' सिनेमातून तिने पदार्पण केलं. त्यानंतर मुसाफिर, एक खिलाडी एक हसीना यासारख्या चित्रपटातही ती झळकली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tejashri Pradhan: तेजश्री प्रधाननं 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतून घेतला ब्रेक, पोहोचली 'या' ठिकाणी, पोस्ट शेअर करत म्हणाली...
तेजश्री प्रधाननं 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतून घेतला ब्रेक, पोहोचली 'या' ठिकाणी, पोस्ट शेअर करत म्हणाली...
Sayani Chakraborty: रोहिणी पाराध्येनंतर आणखी एका इन्फ्ल्युएंसरनं उचललं टोकाचं पाऊल; राहत्या खोलीतच जीवन संपवलं, कारण...
रोहिणी पाराध्येनंतर आणखी एका इन्फ्ल्युएंसरनं उचललं टोकाचं पाऊल; राहत्या खोलीतच जीवन संपवलं, कारण...
Gautami Patil: गौतमी पाटील अन् भाऊ कदम पहिल्यांदाच एकत्र; 'हिल पोरी हिला' गाण्यात झळकणार, रिलीज डेटही समोर
गौतमी पाटील अन् भाऊ कदम पहिल्यांदाच एकत्र; 'हिल पोरी हिला' गाण्यात झळकणार, रिलीज डेटही समोर
Deool Band 2: स्वामींची कृपा अपरंपार; 11 व्या दिवशी 'देऊळ बंद 2' पाहण्यासाठी प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी, किती कोटी कमावले?
स्वामींची कृपा अपरंपार; 11 व्या दिवशी 'देऊळ बंद 2' पाहण्यासाठी प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी, किती कोटी कमावले?

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Share Market Crash : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, निफ्टी 23400 च्या खाली, शेअर मार्केट क्रॅश, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
Embed widget