Jawan : शाहरुखच्या 'जवान' चित्रपटासाठी विजय सेतुपतीनं घेतलं एवढं मानधन; आकडा ऐकून व्हाल अवाक्!
Jawan : जवान या चित्रपटामध्ये शाहरुखसोबत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती (Vijay Sethupathi) हा प्रमुख भूमिका साकारणार आहे.

Jawan : बॉलिवूडमधील बादशाह अशी ओळख असणारा शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत असतो. शाहरुख हा चार वर्षानंतर अभिनय क्षेत्रात कमबॅक करणार आहे. लवकरच त्याचा जवान (Jawan) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. टीझरमधील शाहरुखच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. जवान या चित्रपटामध्ये शाहरुखसोबत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती (Vijay Sethupathi) हा प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी विजयनं किती मानधन घेतलं असेल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात विजयच्या मानधनाबाबत...
विजयनं किती घेतलं मानधन?
जवान चित्रपटामध्ये विजय विजय सेतुपती आणि नयनतारा हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.या चित्रपटात काम करण्यासाठी विजयनं 21 कोटींचे मानधन घेतलं आहे. विजय हा एका चित्रपटासाठी 15 ते 21 कोटी मानधन घेतो. जवान या चित्रपटासाठी विजयनं दोन चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला. विक्रमनं विक्रम वेधा, मास्टर आणि विक्रम यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
'या' अभिनेत्याला विजयनं केलं रिप्लेस
विजय या चित्रपटात बाहुबली चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता राणा दग्गुबातीला रिप्लेस करणार आहे. रिपोर्टनुसार, चित्रपट निर्मात्यांनी राणाला या चित्रपटासाठी संपर्क केला होता पण त्याच्या डेट्स मिळाल्या नसल्यानं राणा या चित्रपटामध्ये काम करु शकला नाही.
कधी रिलीज होणार जवान?
जवान या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. शाहरुखचा आधी पठाण हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. तर जवान हा त्याचा चित्रपट 2 जून 2023 रोजी रिलीज झाला आहे.
जवानच्या टीझरला नेटकऱ्यांची पसंती
सोशल मीडियवर शाहरुखनं जवान चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. टीझर शेअर करुन शाहरुखने कॅप्शनमध्ये लिहिले होते, “2023 असणार अॅक्शन पॅक! 2 जून 2023 रोजी तुमचे मनोरंजन करण्यासाठी 'जवान' चित्रपट रिलीज होतो.' एक मिनिट 30 सेकंदाच्या या टीझरमध्ये शाहरुख डोक्यावर आणि हातावर पट्टी बांधलेली दिसत आहे. या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
