एक्स्प्लोर
'हा' अभिनेता हॉलिवूड अभिनेत्रीसोबत लवकरच विवाहबंधनात

मुंबई : बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात झळकलेला आणि इमोशनल अत्याचार सारख्या कार्यक्रमाचा होस्ट, अभिनेता प्रवेश राणा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. गर्लफ्रेण्ड आणि हॉलिवूड अभिनेत्री स्कारलेट विल्सनसोबत प्रवेश लग्न करत आहे. प्रवेशने 2008 मध्ये मिस्टर इंडिया हा किताब पटकावला होता. त्यानंतर मनोरंजन विश्वात प्रवेश केलेल्या प्रवेशचं ब्रिटीश मॉडेल, अभिनेत्री स्कारलेटसोबत सूत जुळलं. काही वर्षांच्या अफेअरनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. स्कारलेट-प्रवेश 25 ऑगस्टला विवाहबंधनात अडकत आहेत.
विशेष म्हणजे लंडनमध्ये एका शाही सोहळ्यात दोघं लग्न करणार आहेत. वर्षभर लंडनमध्येच राहण्याचा त्यांचा प्लान असून त्यानंतर दिल्ली किंवा मुंबईत ते स्थायिक होतील. प्रवेशने काही टीव्ही शोजसोबत 'साहेब, बिवी और गँगस्टर रिटर्न्स' चित्रपटात भूमिका केली होती. तर स्कारलेट झलक दिखला जा या डान्स रिअॅलिटी शोमध्ये आणि शांघाय, बाहुबली या चित्रपटातील आयटम साँग्जमध्ये दिसली होती.
विशेष म्हणजे लंडनमध्ये एका शाही सोहळ्यात दोघं लग्न करणार आहेत. वर्षभर लंडनमध्येच राहण्याचा त्यांचा प्लान असून त्यानंतर दिल्ली किंवा मुंबईत ते स्थायिक होतील. प्रवेशने काही टीव्ही शोजसोबत 'साहेब, बिवी और गँगस्टर रिटर्न्स' चित्रपटात भूमिका केली होती. तर स्कारलेट झलक दिखला जा या डान्स रिअॅलिटी शोमध्ये आणि शांघाय, बाहुबली या चित्रपटातील आयटम साँग्जमध्ये दिसली होती. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
व्यापार-उद्योग
निवडणूक























