एक्स्प्लोर
कपिल शर्मा डिसेंबरमध्ये गर्लफ्रेण्डसोबत विवाहबंधनात
गर्लफ्रेण्ड गिन्नी चतरथसोबत अमृतसरमध्ये कपिल लगीनगाठ बांधणार असल्याची माहिती आहे

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा डिसेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. गर्लफ्रेण्ड गिन्नी चतरथसोबत शानदार सोहळ्यात कपिल लगीनगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जातं. कपिल शर्मा लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. त्यासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही आनंदाची बातमी आहे. कपिल आणि गिन्नी सात जन्म सोबत राहण्याच्या आणाभाका घेणार आहेत. अमृतसरमध्ये चार दिवस कपिल-गिन्नीचा लग्नसोहळा रंगणार आहे. त्यानंतर बॉलिवूड सेलिब्रेटींसाठी मुंबईत रिसेप्शनचं आयोजन करण्यात येईल. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कपिलने ट्विटरवरुन आपल्या प्रेयसीची ओळख करुन दिली होती. गेलं वर्षभर कपिल शर्माने कठीण काळ पाहिला. कॉमेडी नाईट्स विथ कपिलमधील सहकलाकार सुनिल ग्रोवरशी खटके उडाल्याने कपिल वादाच्या भोवऱ्यात अडकला. कपिलने अनेक वेळा शेवटच्या क्षणी शूटिंग रद्द केली होती. त्यामुळे अजय देवगन, शाहरुख खान, इम्रान हाश्मीसारख्या बड्या कलाकारांना ताटकळत रहावं लागलं होतं. त्यानंतर सोनी वाहिनीवर 'द कपिल शर्मा शो'लाही नारळ देण्यात आला. कपिलची प्रकृती बिघडल्यामुळे 'फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा' हा नवा शोसुद्धा अवघ्या तीन एपिसोडमध्ये गुंडाळण्यात आला.
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















