एक्स्प्लोर

मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोड आणि कोस्टल रोडला जॉन अब्राहमचा विरोध

महाराष्ट्र सरकारने आरे कॉलनीतील 33 हेक्टरवर पसरलेली हिरवळ नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपण योग्य दिशेने वाटचाल करत आहोत का, असा प्रश्न मला पडत असल्याचं जॉन अब्राहम म्हणाला.

मुंबई : मुंबईत मेट्रो 3 कारशेडसाठी 33 हेक्टरवर पसरलेली झाडं तोडण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय चमत्कारिक आहे, असं मत अभिनेता जॉन अब्राहमने व्यक्त केलं आहे. 'बाटला हाऊस' चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजवेळी पाण्याच्या दुर्भिक्ष्यावरुन काळजी व्यक्त करताना जॉनने कारशेडसाठी होणाऱ्या झाडांच्या कत्तलीविषयी भाष्य केलं. 'अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने आरे कॉलनीतील 33 हेक्टरवर पसरलेली हिरवळ नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपण योग्य दिशेने वाटचाल करत आहोत का, असा प्रश्न मला पडतो. झाडांच्या कत्तलीसह कोस्टल रोडलाही माझा विरोध आहे' असं जॉन अब्राहम म्हणाला. मेट्रो रेल्वेसाठी आरे कॉलनीतील प्राणी, झाडं आणि रहिवाशांचं विस्थापन करणं अनाकलनीय आहे, असंही जॉन म्हणाला. जॉनला महाराष्ट्रातील जल परिस्थिती आणि मुंबई पावसामुळे भरणाऱ्या पाण्याविषयीही विचारण्यात आलं. 'आपण पर्जन्य जल संवर्धनात मागे पडत असल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. पाण्याचा साठा व्यवस्थित केल्यास पिण्यायोग्य पाणीही मिळेल, आणि ते रस्त्यावर साठणारही नाही' असं जॉनला वाटतं. जर पर्जन्यमान सुधारलं नाही, तर येत्या तीस वर्षांत नद्या आटतील. पाण्याची सध्या जी परिस्थिती आहे, त्याहून बिकट होईल. त्यामुळे हा गंभीर प्रश्न आहे, असं जॉन म्हणतो. 'बाटला हाऊस' चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज सोहळ्यासा जॉनसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर, नोरा फतेही, दिग्दर्शक निखिल अडवाणी आणि निर्माते भूषण कुमार उपस्थित होते. पर्यावरणप्रेमी आणि विस्थापितांकडून मुंबई महापालिका आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला आतापर्यंत 82 हजार पत्रं मिळाली आहेत. यामध्ये रणदीप हुडा, दिया मिर्झा, आदिल हुसैन, पूजा बेदी यासारख्या सेलिब्रिटींचाही समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका
तर काकाने मनाचा मोठेपणा दाखवून योजनेचे स्वागत करावं, लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून आशिष देशमुख यांचे अनिल देशमुखांना आवाहन
तर काकाने मनाचा मोठेपणा दाखवून लाडकी बहीण योजनेचे स्वागत करावं, आशिष देशमुख यांचे अनिल देशमुखांना आवाहन
हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नाराज? पुढील 2 दिवसात ठोस निर्णय घेणार
हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नाराज? पुढील 2 दिवसात ठोस निर्णय घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaSharad Pawar PC : 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या, शरद पवारांचं मोठं वक्तव्यABP Majha Headlines : 9 AM : 4 OCT 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 8 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका
तर काकाने मनाचा मोठेपणा दाखवून योजनेचे स्वागत करावं, लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून आशिष देशमुख यांचे अनिल देशमुखांना आवाहन
तर काकाने मनाचा मोठेपणा दाखवून लाडकी बहीण योजनेचे स्वागत करावं, आशिष देशमुख यांचे अनिल देशमुखांना आवाहन
हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नाराज? पुढील 2 दिवसात ठोस निर्णय घेणार
हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नाराज? पुढील 2 दिवसात ठोस निर्णय घेणार
Sharad Pawar: शरद पवारांचे संकेत; हर्षवर्धन पाटलांबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुपारपर्यंत....
शरद पवारांचे संकेत; हर्षवर्धन पाटलांबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुपारपर्यंत....
Supriya Sule: अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय; मित्रासोबत गेलेल्या तरूणीवर अपहरण करून सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंची पोस्ट
अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय; मित्रासोबत गेलेल्या तरूणीवर अपहरण करून सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंची पोस्ट
Ratnagiri Crime News : 'दोन दिवस राहिलेत, जगून घे...', एक-दोन नाही तर 30 दुकानांसमोर आढळल्या धमकीच्या चिठ्ठ्या, रत्नागिरीतील घटनेने खळबळ
'दोन दिवस राहिलेत, जगून घे...', एक-दोन नाही तर 30 दुकानांसमोर आढळल्या धमकीच्या चिठ्ठ्या, रत्नागिरीतील घटनेने खळबळ
Bopdev Ghat Incident: तरुणाला बांधून ठेवलं, 21 वर्षीय तरुणीवर तिघांकडून अत्याचार, बोपदेव घाटातील हादरवणारा घटनाक्रम पोलिसांनी सांगितला!
तरुणाला बांधून ठेवलं, 21 वर्षीय तरुणीवर तिघांकडून अत्याचार, बोपदेव घाटातील हादरवणारा घटनाक्रम पोलिसांनी सांगितला!
Embed widget