एक्स्प्लोर

अभिनेता इंदर कुमारच्या ‘आत्महत्येचा’ व्हिडीओ व्हायरल

इंदर कुमारच्या ‘आत्महत्येचा’ व्हिडीओ व्हायरल: अभिनेता इंदर कुमारच्या निधनाला वर्ष होत आलं आहे. मात्र आता त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई: अभिनेता इंदर कुमारच्या निधनाला वर्ष होत आलं आहे. मात्र आता त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये इंदर कुमार आत्महत्या करणार असल्याचं स्वत: सांगत आहे. हा व्हिडीओ इंदर कुमारने मृत्यूच्या आदल्या दिवशी रेकॉर्ड केल्याचा दावा केला जात आहे. इतकंच नाही तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याचे फॅन्स इंदर कुमारने आत्महत्या केल्याचा दावा करत आहेत. सलमान खानसोबत ‘वॉन्टेड’ या सिनेमात सहकलाकाराच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेता इंदर कुमारचं गेल्या वर्षी हृदयविकाराने निधन झालं. इंदर कुमारने गेल्या वर्षी 28 जुलै 2017 रोजी अखेरचा श्वास घेतला.  इंदर कुमार आजारी होता, त्याचवेळी मध्यरात्री त्याला हार्टअटॅक आला. 43 व्या वर्षी इंदर कुमारला मृत्यूने गाठलं. त्यामुळे संपूर्ण बॉलिवूड हळहळलं. आता त्याच्या निधनाला वर्ष होत आलं आहे. मात्र त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मृत्यूनंतरही प्रश्नचिन्ह इंदर कुमारच्या मृत्यूनंतर त्याच्या मृत्यूच्या कारणाबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. इंदर कुमारला त्याच्या मृत्यूची जाणीव आधीच झाली होती असंही म्हटलं गेलं होतं. व्हायरल व्हिडीओत काय आहे? जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्या व्हिडीओमध्ये इंदर कुमार दारुच्या नशेत स्वत:ची परिस्थिती सेल्फी कॅमेऱ्यात सांगत आहे. "माझी परिस्थिती पाहून तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल, घाबरला असाल. मात्र ही सत्य परिस्थिती आहे, मी आत्महत्या करायला निघालो आहे. याचा दोष मी कोणाला देऊ? चूक नव्हे अनेक चुका केल्या आहेत. मी नशेबाज, लंपट आज रस्त्यावर आलो आहे. मी सिक्सपॅक फाडू बॉडीसह अभिनेता बनण्यासाठी आलो होतो. मात्र माझ्या मस्ती/अय्याशीने रस्त्यावर आणलं. माझ्या सल्ल्याने जर तुम्ही काही शिकू शकाल तर शिका, अन्यथा तुम्हीही रस्त्यावर याल. उद्या तुमच्या हातात मोबाईल असेल, तुम्हीही व्हिडीओ बनवत असाल, तुम्हीही मृत्यूचा संदेश देत असाल". यानंतर इंदर कुमार पुन्हा दारु पिऊन हळवा होतो. त्यावेळी तो त्याच्या आईला संदेश देत आहे. आई तू मला सर्वकाही दिलंस. मात्र आता मी काहीही करु शकत नाही. मला माफ करा. आता छोटू (लहान भाऊ)  तू मोठा भाऊ होशील. आता तर मी माफीलायकही राहिलो नाही. VIDEO: व्हायरल सत्य खरंतर इंदर कुमारने मृत्यूच्या एक वर्ष आधी 2016 मध्ये इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. त्यावेळी त्याने फोटोसह ‘हॅपीनेस’ अशी कॅप्शन लिहिली होती. त्यानंतर इंदर कुमारने कोणतीही पोस्ट केली नाही. मग त्याने मृत्यूच्या आदल्या दिवशी 27 जुलै 2017 रोजी स्वत:चा एक फोटो शेअर केला. त्यामध्ये त्याने पीस अर्थात शांती असं लिहिलं. मात्र इंदर कुमारची ही पोस्ट ज्या अकाऊंटवरुन शेअर करण्यार आली आहे, ते अकाऊंट व्हेरिफाईड नाही. दुसरीकडे काही रिपोर्टनुसार हा व्हिडीओ आत्महत्येशी संबंधित नाही, तर तो त्याचा आगामी सिनेमाचा भाग होता. दरम्यान, या व्हिडीओबाबत इंदर कुमारची पत्नी लवकरच पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. महेश कोठारेंच्या 'माझा छकुला'वर आधारित 'मासूम' या हिंदी चित्रपटातून इंदर कुमारने पदार्पण केलं होतं. त्यानंतर सलमान खानसोबत तुमको ना भूल पाएंगे, वाँटेड यासारख्या चित्रपटात त्याने भूमिका केल्या होत्या. त्याने जवळपास 20 चित्रपटात काम केलं आहे. मृत्यूपूर्वी तो 'फटी पडी है यार' चित्रपटाचं शूटिंग करत होता. संबंधित बातमी

मासूम, वाँटेड फेम अभिनेता इंदर कुमारचं निधन

मृत्यूपूर्वी काही तास अगोदर इंदर कुमारची पोस्ट, चाहतेही हळहळले

महत्त्वाच्या बातम्या

Narayani Shastri on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
Lalit Prabhakar Sai Tamhankar Viral Photo: प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget