South Actor : 'पुष्पा' फेम अभिनेत्याला 41 व्या वर्षी गंभीर आजाराची लागण, म्हणाला, 'आता या रोगावर उपचार...'
South Actor : पुष्पा फेम अभिनेत्याला गंभीर आजाराची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. या अभिनेत्याने स्वत:यावर भाष्य केलं आहे.
Fahadh Faasil : मल्याळम सुपरस्टार फहाद फासिलच्या (Fahadh Faasil) आवेशम या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे फहाद आता 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'पुष्पा 2' (Pushpa 2) या सिनेमात देखील झळकणार आहे. या सिनेमातून तो खलनायिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्याच्या या सिनेमाची देखील अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. पण या अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या एका माहितीमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
आवेशम या सिनेमातील त्याच्या अॅक्शन सीन्सचं बरंच कौतुक झालं. दरम्यान त्याच्या सिनेमाच्या संदर्भातील एका कार्यक्रमात फहाद त्याच्या या आजाराबाबत खुलासा केला आहे. फहादला एडीएचडी म्हणजेच अटेंशन-डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डर झाल्याचं त्याने सांगितलं आहे. त्याचप्रमाणे त्याला 41 व्या वर्षी हा आजार झाल्याने त्यावर निदान करता येणार नसल्याचा खुलासा देखील यावेळी फहादने केला आहे.
फहादने काय म्हटलं?
पीटीआयच्या वृत्तानुसार, एका कार्यक्रमात फहादने याविषयी भाष्य केलं आहे. यावेळी त्याने म्हटलं की, 'मला एडीएचडीचं निदान लहान वयात झालं असतं तर त्यावर उपचार घेता आले असते आणि त्यावर सहज मात देखील करता आली असती. पण 41 व्या वर्षी मला या आजाराचं निदान झालं आहे. मी डॉक्टरांना याबाबत विचारलं पण की मला या वयात हा आजार झाला आहे तर त्यावर उपचार घेता येतील का?'
अटेंशन-डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डर अर्थातच एडीएचडी म्हणजे काय?
अटेंशन-डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजेच एडीएचडी हा एक मेंदूशी संबधित आजार आहे. यामध्ये मेंदूच्या लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता, वागणूक आणि प्रतिसाद देण्याच्या क्षमेतवर परिणाम करत असतो. लहान मुलांना हा आजार होणं ही अगदीच सामान्य गोष्ट आहे. त्याचप्रमाणे जर लहान वयात हा आजार झाला तर त्यावर उपचार देखील घेता येतात. पण जर वयाच्या ठरावीक टप्प्यानंतर हा आजार झाल्यास त्यावर उपचार करणं कठिण असतं.
View this post on Instagram