एक्स्प्लोर
रिव्ह्यू : शेवट 'बदला'
सुजाॅय घोष हा हुशार दिग्दर्शक आहे. त्याला नेहमीच गूढकथा किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तपासकथांचं आकर्षण राहिलं आहे. कहानी, कहानी २, अहल्या अशा त्याच्या चित्रकृतींकडे पाहिलं तर ते प्रकर्षानं जाणवतं. आता हा दिग्दर्शक बदला हा चित्रपट घेऊन आला आहे.
अमिताभ बच्चन, तापसी पन्नू यांच्या या सिनेमात सतत वेळोवेळी महाभारताचे संदर्भ आहेत. यातल्या चर्चेत सतत द्रौपदी, कृष्ण, अर्जुन, चक्रव्यूह, धृतराष्ट्र, संजय यांचे संदर्भ येत राहतात. त्यातला महत्वाचा संदर्भ हा धृतराष्ट्र आणि संजयाबद्दलचा आहे. धृतराष्ट्र आंधळा होता. संजय त्याला महाभारताचं जे वर्णन सांगत असे तेच त्याच्यासाठी सत्य होतं. ते सत्य होतं किंवा तेच सत्य मानणं हे धृतराष्ट्राला क्रमप्राप्त होतं. कोर्ट धृतराष्ट्रासारखं असतं, असं सांगत सिनेमातला वकील जेव्हा नायिकेला सत्य आणि असत्यातला फरक सांगतो किंवा दरवेळी बदला घेणं गरजेचं नसतं तस दरवेळी माफ करणंही गरजेचं नसतं असं सांगतो तेव्हा या सिनेमातल्या गाभ्याला स्पर्श करण्यासाठी त्याने एकप्रकारे आपला हात पुढं केलेला असतो.
सुजाॅय घोष हा हुशार दिग्दर्शक आहे. त्याला नेहमीच गूढकथा किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तपासकथांचं आकर्षण राहिलं आहे. कहानी, कहानी २, अहल्या अशा त्याच्या चित्रकृतींकडे पाहिलं तर ते प्रकर्षानं जाणवतं. आता हा दिग्दर्शक बदला हा चित्रपट घेऊन आला आहे. 2007 मध्ये आलेली स्पॅनिश फिल्म द इन्व्हिजिबल गेस्ट सिनेमाचा हा रिमेक आहे. कथानकात फार बदल नसले तरी व्यक्तिरेखांत काही बदल दिसतात.
ही गोष्ट नैनाची आहे. नैना ही प्रख्यात उद्योगपती आहे. तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. पण आता नैनावर एका खुनाचा आरोप झाला आहे. अर्जुन नामक इसमाचा तिने खून केल्याचं सिद्ध व्हायला आता अवघे काही तास उरले आहेत. पण नैना आपल्या मतावर ठाम आहे. तिची केस सोडवण्यासाठी आता बादल गुप्ता यांना पाचारण करण्यात आलं आहे. बादल हे अत्यंत नावाजलेले वकील आहेत. आपल्या ४० वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी एकही केस हारलेली नाही. आता बादल यांनी नैनाची केस घेतली आहे. त्यावेळी नेमकं काय घडलं हे नैना बादल यांना सांगतानाच एकएक गुंता नव्याने निर्माण होत जातो आणि चित्रपट थरारक होतो.
एकच घटना वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या दृष्टिकोनातून पाहणं ही बाब आता नवी राहिली नाही. म्हणजे या घटनेत दोन मुख्य व्यक्तिरेखा आहेत. एक नैना आणि अर्जुन. त्यांच्या आयुष्यात एक घटना येते. आता त्या घटनेकडे पाहण्याचे दोघांचे दोन दृष्टिकोन यात आहेतच. शिवाय काही सरप्राईजेसही आहेत. जसं, सनी नावाच्या व्यक्तिरेखेचं सिनेमात येणं.. त्याचं जिवंत असणं. अर्जुनच्या खिशातला फोन अचानक वाजणं अशा अनेक गोष्टींनी चित्रपट आपल्याला पुरता खिळवून ठेवतो. यात शंका नाही. पण वेळोवेळी आपले आडाखे चुकवत पटकथा पुढे सरकते तेव्हा सरते शेवटी आपल्याला काहीतरी भलतंच पाहायला मिळणार आहे, याची खात्री पटू लागते. ही मनीषा उत्तरार्धाच पदोपदी खरी ठरणार असं वाटू लागतं. याचं श्रेय पटकथेला, संवादांना, अभिनयाला आहेच. पण ज्यासाठी हा सगळा अट्टहास चालू आहे, त्याचा शेवट पाहाणं हे तितकंच चकित करणारं असायला हवं. तर तिथं मात्र जरा चुकामुक झाल्याचा फील येतो. शेवट होतो पण तो होता होता मनात अनेक प्रश्न निर्माण करून जातो. या चित्रपटात नैना-अर्जुन यांच्यासह राणी-निर्मल ही मंडळीही आहेत. त्यांचाही वेगळा रोल आहे सिनेमात. पण जी युक्ती सिनेमाच्या शेवटी वापरण्यात आली आहे त्यामुळे अरेच्चा.. असं होतं होय.. असं वाटून जातं. साहजिकच सिनेमा झालासे कळस.. असं काही होत नाही.
चित्रपटात भूमिका चोख आहेत. अमिताभ बच्चना, तापसी पन्नू, अमृता सिंग आदींच्या यातल्या भूमिका चोख आहेत. पटकथा, संवाद, पार्श्वसंगीत, कलादिग्दर्शन आदी सर्वच बाबतीत चित्रपट सरस असला तरी वर सांगितल्याप्रमाणे चित्रपटाच्या शेवटामुळे चित्रपटगृहातून बाहेर पडताना परिपूर्ण मजा येत नाही. हा शेवट वगळला तर मात्र त्यातला थरार कायम आहे. अर्थात अशा गूढ तपासकथेचा हा काही पहिला सिनेमा नाही. एकूणात अमिताभ बच्चन, तापसी यांचा अभिनय पाहायचा असेल तर एकदा बघून यायला हरकत नाही. म्हणूनच पिक्चरबिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळताहेत अडीच स्टार्स
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
भविष्य
Advertisement