एक्स्प्लोर

Abhishek Shivaleeka Wedding : 'दृश्यम 2'चा दिग्दर्शक अभिषेक पाठक अडकला लग्नबंधनात; ग्रॅंड वेडिंगचा फर्स्ट PHOTO आला समोर

Abhishek Shivaleeka Wedding : 'दृश्यम 2'चा दिग्दर्शक अभिषेक पाठक (Abhishek Pathak) 'खुदा हाफिज' फेम शिवालिका ओबेरॉयसोबत (Shivaleeka Oberoi) लग्नबंधनात अडकला आहे.

Abhishek Pathak Shivaleeka Oberoi Wedding : बॉलिवूडमध्ये लगीनघाई सुरु झाली आहे. अथिया शेट्टी-केएल राहुलनंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीने लग्न केलं आहे. अशातच आता 'खुदा हाफिज' फेम शिवालिका ओबेरॉय (Shivaleeka Oberoi) आणि 'दृश्यम 2'चा (Drishyam 2) दिग्दर्शक अभिषेक पाठक (Abhishek Pathak) लग्नबंधनात अडकले आहेत. 9 फेब्रुवारीला गोव्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. 

अभिषेक-शिवालिकाच्या लग्नसोहळ्यात सेलिब्रिटींची मांदियाळी

अभिषेक पाठक आणि शिवालिका ओबेरॉयच्या लग्नसोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अमन देवगण, अजय देवगण, कार्तिक आर्यन, नुसरत भरुचा, विद्युत जामवाल, सनी सिंह, भूषण कुमार, लव रंजन आणि इशिता राज शर्मासह अनेक सेलिब्रिटींनी अभिषेक आणि शिवालिकाच्या लग्नसोहळ्यात हजेरी लावली होती. 

शिवालिका आणि अभिषेकने शेअर केला फोटो

नवविवाहित जोडप्याने अर्थात शिवालिका ओबेरॉय आणि अभिषेक पाठकने सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे, "प्रेम हे सापडत नसतं तर ते तुम्हाला शोधत असतं. 9 फेब्रुवारी 2023 रोजी आम्ही कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकलो आहोत. आयुष्याच्या या नव्या प्रवासाची सुरुवात करताना आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे". सध्या सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shivaleeka Oberoi (@shivaleekaoberoi)

अभिषेक आणि शिवालिकाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या... 

अभिषेकसाठी 2022 हे वर्ष खूपच खास होतं. अभिषेकचा 'दृश्यम 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमात अजय देवगण, श्रिया सरन, तब्बू, अक्षय खन्ना आणि इशिता दत्ता मुख्य भूमिकेत होते. निशिकांत कामतचा 2015 साली आलेल्या 'दृश्यम' सिनेमाचा हा सीक्वेल आहे. तर दुसरीकडे शिवालिका ओबेरॉयने 'ये साली आशिकी'च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तसेच 'खुदा हाफिज'मध्ये देखील तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. 'खुदा हाफिज'ची निर्मिती अभिषेकने केली आहे. याच सिनेमाच्या शूटिंगदरम्या अभिषेक आणि शिवालिकाची मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अखेर आता ते लग्नबंधनात अडकले आहेत. 

संबंधित बातम्या

Sidharth Malhotra Kiara Advani Wedding: कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; नेटकरी म्हणाले, 'कबीर सिंह...'

महत्त्वाच्या बातम्या

Adinath Kothare Urmilla Kanetkar Divorce: 'सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण...'; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट
'सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण...'; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट
Aamir Khan Third Marriage Controversy: 'मी त्याला रडताना पाहिलंय...'; तिसऱ्या लग्नावरुन आमिर खान जबरदस्त ट्रोल, प्रसिद्ध अभिनेत्याचं भुवया उंचावणारं वक्तव्य
'मी त्याला रडताना पाहिलंय...'; तिसऱ्या लग्नावरुन आमिर खान जबरदस्त ट्रोल, प्रसिद्ध अभिनेत्याचं भुवया उंचावणारं वक्तव्य
Ramayana Trailer Gets U Certificate: 4000 कोटींच्या 'रामायण'बाबत मेकर्सचा मोठा निर्णय; दोन ट्रेलर रिलीज होणार, सेंसर बोर्डाकडून मिळालं U सर्टिफिकेट
4000 कोटींच्या 'रामायण'बाबत मेकर्सचा मोठा निर्णय; दोन ट्रेलर रिलीज होणार, सेंसर बोर्डाकडून मिळालं U सर्टिफिकेट
Atul Kulkarni Supports Sonam Wangchuk: अतुल कुलकर्णी सोनम वांगचुक यांच्या उपोषणात सहभागी; नेटकरी म्हणाले, 'तुमचं कौतुकच, पण आमीर, सलमान, शाहरुख पाठींबा का देत नाहीत?'
अतुल कुलकर्णी सोनम वांगचुक यांच्या उपोषणात सहभागी; नेटकरी म्हणाले, 'तुमचं कौतुकच, पण आमीर, सलमान, शाहरुख पाठींबा का देत नाहीत?'

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget