Bollywood Celebs TV Ad Controversy: आमिर-कियाराच्या जाहिरातीचा वाद; याआधी 'हे' सेलिब्रेटी झालेत ट्रोल
कियारा आणि आमिरच्या या जाहिरातीच्या आधी देखील अनेक सेलिब्रिटींना जाहिरातीमध्ये काम केल्यानं नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
Bollywood Celebs TV Ad Controversy: सध्या अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) हे सध्या त्यांच्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आहेत. सोशल मीडियावर अनेक नेटकरी कियारा आणि आमिरच्या जाहिरातीला ट्रोल करत आहेत. जाहिरातीमध्ये हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी देखील या जाहिरातीवर टीका केली होती. त्यांनी एक ती जाहिरात ट्विटरवर शेअर करुन लिहिलं, 'असा मूर्खपणा करा आणि मग म्हणा की, हिंदू आम्हाला ट्रोल करत आहेत...' कियारा आणि आमिरच्या या जाहिरातीच्या आधी देखील अनेक सेलिब्रिटींना जाहिरातीमध्ये काम केल्यानं नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
अक्षय कुमार (Akshay Kumar)
एका तंबाखूच्या जाहिरातीमध्ये काम केल्यानं अनेकांनी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला ट्रोल केलं होतं. जाहिरातीमुळे नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अक्षयनं चाहत्यांची माफी मागितली होती. अक्षयसोबतच अजय देवगण आणि शाहरुख खान यांना देखील तंबाखूच्या जाहिरातीमध्ये काम केल्यानं नेटकऱ्यांनी ट्रोल केलं.
विक्की कौशल (Vicky Kaushal)
एका मेन्स अंडरगार्मेटच्या जाहिरातीमध्ये काम केल्यामुळे विक्की कौशलला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. या जाहिरातीमध्ये विक्कीसोबतच अभिनेत्री रश्मिका मंदनानं काम केलं होतं.
आलिया भट्ट (Alia Bhatt)
अभिनेत्री आलिया भट्टनं एका वेडिंग वेअर कंपनीच्या जाहिरातीमध्ये काम केलं होतं. या जाहिरातीमध्ये तिनं नववधुसारखा मेक-अप केला होता. या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलेलं कन्यादान आणि महिलांबाबतचे काही मुद्दे हे नेटकऱ्यांना खटकले होते. त्यानंतर अनेकांनी आलियाला ट्रोल केलं होतं.
यामी गौतम (Yami Gautam)
फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीमध्ये काम केल्यामुळे अभिनेत्री यामी गौतमला अनेकांनी ट्रोल केलं. वर्णद्वेष केल्याचा आरोप काही नेटकऱ्यांनी यामीवर केला होता. त्यानंतर त्या जाहिरातीमधून फेअर हा शब्द काढण्यात आला.
आमिर खान आणि कियारा अडवाणीने ज्या जाहिरातीत काम केले आहे. त्यामध्ये दोघे वधू आणि वरच्या वेशात दिसत आहेत. या जाहिरातीवर विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट शेअर करुन टीका केली. विवेक अग्निहोत्री यांच्या या ट्विटवर लोकांच्या प्रतिक्रिया दिली. एका यूजरने लिहिले की, 'प्रत्येकवेळी आमच्याच धार्मिक भावना का दुखावल्या जातात, इतर कोणत्याही धर्माच्या का नाही?'
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: