एक्स्प्लोर
'ठग्स ऑफ हिंदुस्तान'चा लूक लीक झाल्याने आमिर नाराज
काही दिवसांमध्येच अधिकृतपणे लूक रिलीज केला जाणार होता, अशी जाहीर नाराजी आमिरने एका मुलाखतीत व्यक्त केली.
मुंबई : 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'मधील बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेता आमिर खानचा लूक काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र या गोष्टीमुळे आपण नाराज असल्याचं स्वतः आमिरने म्हटलं आहे.
संपूर्ण टीमसाठी ही गोष्ट निराशाजनक आहे. कारण काही दिवसांमध्येच अधिकृतपणे लूक रिलीज केला जाणार होता, अशी जाहीर नाराजी आमिरने एका मुलाखतीत व्यक्त केली.
‘’लूक व्हायरल व्हायला नको होता. कारण 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' अत्यंत महत्त्वाचा सिनेमा आहे. ठरलेल्या वेळेनुसार अधिकृतपणे लूक रिलीज केला जाणार होता, जो आताही करणार आहोत. पण लीक झाला नसता तर चांगलं झालं असतं’’, असं आमिर म्हणाला.
प्रत्येकाकडे आज कॅमेरा आहे. कुणावर किती नियंत्रण ठेवणार? ‘पीके’मधील घागराचा लूकही शुटिंगच्या पहिल्याच दिवशी लीक झाला होता. मात्र हे थांबायला हवं, अशी चिंताही आमिरने व्यक्त केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement