Aalia Bhatt Saree look Met Gala : अप्सरा, मस्तानी साऱ्याच फेल; आलियाच्या लूकला तोडच नाही, मेट गालासाठी 163 कामगारांनी 1965 तासांत तयार केली भरजरी साडी
Aalia Bhatt Saree look Met Gala : आलिया आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करते.आता तिने मेट गाला 2024 (Mate Gala) मध्ये आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला आहे.
Aalia Bhatt Saree look Met Gala : अभिनेत्री आलिया भटने (Aalia Bhatt) बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने छाप सोडली आहे. आलिया ही आपल्या अभिनयासह फॅशन सेन्ससाठीदेखील ओळखली जाते. आलिया आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करते.आता तिने मेट गाला 2024 (Mate Gala) आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला आहे. मेट गालामध्ये आलियाच्या लूक हवा असून तिने नेसलेल्या साडीची जोरदार चर्चा सुरू आहे.
मेट गालाच्या रेड कार्पेटवर आलियाने साडीमध्ये वॉक केला. साडीमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती. आलियाचा मेट गालातील लूक समोर आल्यानंतर तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना चाहते थकत नाही. सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडीओ शेअर होत आहेत. आलियाच्या या सौंदर्यासमोर अप्सरा, मस्तानी सगळ्याच फेल आहेत असे चाहत्यांना वाटू लागले आहे.
मेट गालाच्या रेड कार्पेटसाठी आलियाने सब्यसांचीने डिझाईन केलेली पेस्टल कलरची साडी परिधान केली होती. आलियाने आपला लूक हा दागिने आणि मिनिमल मेकअपने पूर्ण केला. स्मितहास्यामुळे तिचे सौंदर्य आणखीच खुललं आहे.
a desi women gonna eat up all the goras at their own event alia bhatt i wasn't familiar with your game at the met gala pic.twitter.com/KTOiNPGi6H
— 𓅪 (@alfiyastic) May 6, 2024
1965 तासांत तयार झाली भरजरी साडी
View this post on Instagram
मेट गाला 2024 मध्ये 'द गार्डन ऑफ टाइम' अशी थीम होती. त्यानुसार ही साडी डिझाईन करण्यात आली होती.आलियाची ही खास साडी 163 जणांनी मिळून तयार केली. यासाठी त्यांना एकूण 1965 तास लागले. या साडीवर कमालीचे आर्टवर्क आहे. साडीवर हाताने फुलांची शिवण करण्यात आली असून संपूर्ण साडी हँडस्टिच्ड आहे. साडीत वेगवेगळे रंग आहेत. पृथ्वी,आकाश आणि समु्द्र यांना दर्शवणारे रंग साडीत आहेत. हे रंग निसर्गाचं सौंदर्य दाखवतात. या साडीसोबत तिने परिधान केलेला ब्लाऊज आकर्षक असून डबल फ्रील मेगा लेंथ स्लीव्ह्ज आहेत. ब्लाऊज डीप नेक आहे.
आलियाच्या या कातिल लूकवर चाहते फिदा झाले असून तिला राजकुमारीची उपाधी दिली आहे. आलियाच्या लूकने मेट गालावर आपली छाप सोडली आहे.