एक्स्प्लोर
ठाकरे सिनेमाचं 80 टक्के काम पूर्ण, सिक्वलही येणार : संजय राऊत
अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकीच्या भूमिकेचंही चित्रीकरण पूर्ण झालं असल्याची माहिती सिनेमाचे निर्माता आणि खासदार संजय राऊत यांनी दिली.

मुंबई : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट 'ठाकरे' सिनेमाचे पुढचे भागही येणार आहेत. सध्या निर्मिती प्रक्रियेमध्ये असलेल्या या सिनेमाचं जवळपास 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकीच्या भूमिकेचंही चित्रीकरण पूर्ण झालं असल्याची माहिती सिनेमाचे निर्माता आणि खासदार संजय राऊत यांनी दिली. ‘माझा कट्टा’वर संजय राऊत यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. हा संपूर्ण कार्यक्रम आज सायंकाळी सहा वाजता आणि रात्री 9 वाजता तुम्ही एबीपी माझावर पाहू शकता. अलीकडच्या काळात येणाऱ्या जीवनपटांचं संजय राऊत यांनी समर्थन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांदी यांच्यावरही सिनेमे यायला हवेत. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट ठाकरे सिनेमाचं काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचा दुसरा भागही येणार आहे. शिवाय कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर सिनेमा बनवणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. ठाकरे सिनेमा 23 जानेवारी 2019 रोजी रिलीज होणार आहे. 18 जुलै रोजी या सिनेमाचा नवा लूक रिलीज झाला होता, ज्यामध्ये अभिनेता नवाझुद्दीन बाळासाहेबांच्या भूमिकेत दिसत आहे. शिवाय
आणखी वाचा
पर्सनल कॉर्नर
टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Batmya

Mrunal Thakur : मृणाल ठाकूरचा स्टनिंग लूक
ABP Majha Batmya

Shilpa Shetty : शिल्पाचा बोल्ड लूक
ABP Majha Batmya

Girish Mahajan Majha Katta : सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये का घेतलं?
ABP Majha Batmya

Girish Mahajan Majha Katta : दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नात खरंच गिरीश महाजन गेले होते?
ABP Majha Batmya

Nashik Mahapalika Elections : शिंदेंच्या शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडत शिवीगाळ


















